Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | The Only Temple Where Transgenders Marry God

येथे देवासोबत एक दिवसासाठी लग्न करतात किन्नर, महाभारताशी आहे संबंध

जीवनमंत्र डेस्क | Update - Aug 08, 2017, 11:24 AM IST

तामिळनाडूमध्ये अरावन देवतेची पुजा करण्याची प्रथा असून यांना इरावन असेही म्हटले जाते.

 • The Only Temple Where Transgenders Marry God
  तामिळनाडूमध्ये अरावन देवतेची पुजा करण्याची प्रथा असून यांना इरावन असेही म्हटले जाते. या देवाला येथे किन्नरांची देवता असेही संबोधले जाते. अरावन देवता महाभारतातील प्रमुख पात्रांमधील एक होते आणि युद्धामध्ये त्यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.

  दक्षिण भारतात किन्नरांना अरावनीही म्हटले जाते. किन्नर आणि अरावन देवतेचा वर्षातून एकदा विवाह होत असतो. पण हा विवाह केवळ एका दिवसाचा असतो. दुस-या दिवशी या देवतेचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर विवाह केलेले किन्नर विधवा होतात.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोण आहे अरावन आणि महाभारताशी काय आहे संबंध...

 • The Only Temple Where Transgenders Marry God
  अर्जुन आणि नागकन्या उलुपीचे पुत्र होते अरावन
  महाभारताच्या कथेनुसार, द्रौपदीसोबत लग्न झाल्यानंतर पांडवांनी तिच्यासंदर्भात एक नियम केला होता त्या नियमाचे अर्जुनाने एकदा पालन न केल्यामुळे त्याला इंद्रप्रस्थमधून बाहेर काढून देण्यात आले होते. अर्जुनाला एका वर्षासाठी तीर्थयात्रेला पाठवण्यात आले. तेथून निघाल्यानंतर अर्जुन उत्तर पूर्व भारतात गेले. तेथे त्याची भेट एका नागकन्या उलुपीबरोबर झाली. दोघे एकमेकांवर प्रेम करू लागतात. काही दिवसानंतर उलूपी आणि अर्जुन विवाह करतात. विवाहानंतर काही काळाने उलुपी एका मुलाला जन्म देते. त्याचे नाव ती अरावन ठेवते. आपल्या मुलाच्या जन्मानंतर अर्जुन त्या दोघांना सोडून पुढच्या यात्रेसाठी निघून जातो. अरावन नागलोकात आपल्या आईबरोबरच राहत असतो. तरुणपणी तो नागलोक सोडून आपल्या पित्याकडे येतो. तेव्हा कुरूक्षेत्रात महाभारताचे युद्ध सुरू असते. त्यामुळे अर्जुन त्याला युद्धासाठी रणभूमीत पाठवतो.

  पुढील स्लाईडवर वाचा, महाभारत युद्धामध्ये अरावनची काय भूमिका होती...
 • The Only Temple Where Transgenders Marry God
  युद्धात केला होता प्राणत्याग
  महाभारताच्या युद्धात एक अशी वेळ येते जेव्हा पांडवांना विजयासाठी काली काली मातेच्या चरणी स्वच्छेने एक नरबळी द्यायचा असतो. त्यावेळी अरावन स्वतः त्यासाठी पुढे येतो. परंतु अरावन अविवाहीत राहून बळी देणार नसल्याचे सांगतो. त्यावेळी सगळ्यांसमोरच समस्या उभी राहते. आपली मुलगी दुस-याच दिवशी विधवा होईल म्हणून कोणीही त्याच्याबरोबर मुलीचा विवाह लावून देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे श्री कृष्ण स्वतः मोहिनी रूप धारण करून अरावनबरोबर विवाह करतात. दुस-या दिवशी अरावत स्वतः आपले शीर काली मातेला अर्पण करतो. अरावनच्या मृत्यूनंतर श्रीकृष्ण त्याचरुपात बराच काळ दुःख व्यक्त करतात. श्री कृष्ण पुरुष असून स्त्री रुपात अरावनबरोबर विवाह करतात. त्यामुळे स्त्री रुपातील पुरुष म्हणून ओळखळे जाणारे किन्नर ही अरावन देवतेशी एका रात्रीपुरता विवाह करत असतात. व त्यांनाच अराध्य देवता मानतात.
 • The Only Temple Where Transgenders Marry God
  किन्नरांचा सर्वात मोठा उत्सव
  तामिळनाडूमधील कूवगम गावात दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात 18 दिवस चालणारा उत्सव साजरा केला जातो. देशभरातून त्यासाठी किन्नर जमा होत असतात. सुरुवातीचे 16 दिवस गाण्यांवर नाचगाणे सुरू असते. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात विवाहाची तयारी सुरू असते. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट सुरू असतो. 17 व्या दिवशी पुजारी 17 एक खास पुजा करतात. देवाला नारळाची भेट दिली जाते. त्यानंतर अरावन देवासमोर पुजा-याकडून किन्नरांच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. त्याला थाली म्हटले जाते. नंतर मंदिरात अरावनाच्या मूर्तीशी विवाह लावला जातो. अखेरच्या म्हणजे 18 व्या दिवशी कूवगम गावात अरावनाच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. नंतर ती मूर्ती नष्ट केली जाते. त्यानंतर नवरी बनलेले किन्नर त्यांचे मंगळसूत्र तोडून टाकतात. तसेच चेह-यावरील श्रृंगारही काढला जातो. नंतर ते पांढरे वस्त्र परिधान करतात आणि दुःख व्यक्त करतात. 
 • The Only Temple Where Transgenders Marry God
  उत्सव काळात किन्नरांना मंगळसूत्र घालताना मंदिरातील पुजारी
 • The Only Temple Where Transgenders Marry God
  उत्सव काळात किन्नरांना मंगळसूत्र घालताना मंदिरातील पुजारी
 • The Only Temple Where Transgenders Marry God
  लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मंगळसूत्र काढताना पुजारी 
 • The Only Temple Where Transgenders Marry God
  विवाह उत्सवातील किन्नर
 • The Only Temple Where Transgenders Marry God
  दुसऱ्या दिवशी देवाच्या मृत्यूचा शोक करताना किन्नर

Trending