Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | This Is 2 Brothers Of Bhishm, Know About Him

हे होते भीष्माचे 2 भाऊ, फार कमी लोकांना माहिती असावे यांच्याविषयी

जीवनमंत्र डेस्क | Update - Nov 15, 2017, 12:27 PM IST

महाभारतानुसार, भरतवंशी राजा शांतनूचे पहिले लग्न देवनदी गंगासोबत झाले होते. यांच्यापासून भीष्म यांचा जन्म झाला.

 • This Is 2 Brothers Of Bhishm, Know About Him
  महाभारतानुसार, भरतवंशी राजा शांतनूचे पहिले लग्न देवनदी गंगासोबत झाले होते. यांच्यापासून भीष्म यांचा जन्म झाला. गंगा निघून गेल्यानंतर राजा शांतनू यांनी सत्यवतीसोबत दुसरे लग्न केले. सत्यवतीला दोन पुत्र झाले - चित्रांगद आणि विचित्रवीर्य. हे दोघेही भीष्म यांचे सावत्र भाऊ होते.

  असा झाला चित्रांगदचा मृत्यू...
  महाराज शांतनूच्या मृत्यूनंतर भीष्म यांनी चित्रांगदला राजा बनवले. चित्रांगदने आपल्या पराक्रमाने सर्व राजांना पराभूत केले. त्यानतंर गंधर्वचा राजा चित्रांगद याने हस्तिनापूरवर हल्ला केला. गंधर्वाचा राजा चित्रांगद आणि हस्तिनापूरचा राजा चित्रांगद यांच्यामध्ये तीन वर्ष युद्ध चालले. गंधर्व राजा अत्यंत मायावी होता त्याने आल्या मायावी शक्तीने भीष्माचा भाऊ चित्रांगदचा वध केला.

  महाभारताच्या इतर प्रमुख पात्रांचा मृत्यू कसा झाला, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • This Is 2 Brothers Of Bhishm, Know About Him
  क्षय रोगाने झाला विचित्रवीर्यचा मृत्यू
  चित्रांगद राजाच्या मृत्यूनंतर भीष्म यांनी सत्यवतीच्या दुसरे पुत्र विचित्रवीर्यला हस्तिनापूरच्या गादीवर बसवले. तरुण झाल्यानंतर विचित्रवीर्य यांचे लग्न काशीच्या राजकुमारी अंबिका आणि अंबालिकासोबत लावण्यात आले. लग्नानंतर 7 वर्षांनी विचित्रवीर्यचा क्षय (टीबी) रोगाने मृत्यू झाला.
 • This Is 2 Brothers Of Bhishm, Know About Him
  कसा झाला होता धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीचा मृत्यू?
  महाभारतानुसार, युद्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी पांडवांसोबत 15 वर्ष राहिले. त्यानंतर ते कुंती, विदुर आणि संजयसोबत तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेले. एके दिवशी गंगेत स्नान करून आश्रमात आले आणि त्याचवेळी  अचानक आश्रमाला आग लागली. वृद्धावस्थेमुळे धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती पळण्यास असमर्थ होते. यामुळे त्याची त्याच अग्निमध्ये प्राणत्याग करण्याचा विचार केला आणि एकाग्रचित्त होऊन तेथेच बसले. अशाप्रकारे धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीने प्राणत्याग केला.
 • This Is 2 Brothers Of Bhishm, Know About Him
  सत्यवती, अंबिका आणि अंबालिका 
  महाभारतानुसार, राजा पांडूच्या मृत्यूनंतर सत्यवतील खूप दुःख झाले. सत्यवतीला दुखी पाहून महर्षीं वेदव्यास यांनी सत्यवतील सांगितले की, आता खूप वाईट दिवस येणार आहेत. पाप वाढल्याने लोक अधर्माकडे वळले आहेत. कौरवांच्या अन्यायामुळे मोठा संहार होईल. आता तुम्हीही वनात जाऊन तपश्चर्या करा. स्वतःच्या डोळ्यांसमोर वंशाचा नाश पाहणे योग्य नाही. त्यानंतर सत्यवती अंबिका आणि अंबालिका यांना घेऊन वनात गेली. वनामध्ये कठोर तपश्चर्या करून त्यांनी शरीराचा त्याग केला.
 • This Is 2 Brothers Of Bhishm, Know About Him
  शकुनी आणि उलुक
  युद्धामध्ये सहदेवने धाडसाने युद्ध करत शकुनी आणि उलूक (शकुनीचा मुलगा)ला जखमी केले आणि पाहता पाहता उलूकचा वध केला. आपल्या मुलाचे शव पाहून शकुनीला खूप दुःख झाले आणि तो युद्धभूमी सोडून पळू लागला. सहदेवने पाठलाग करून शकुनीला पकडले. जखमी असूनही शकुनीने सहदेवसोबत युद्ध केले परंतु शेवटी सहदेवाच्या हातून शकुनीचा वध झाला.
 • This Is 2 Brothers Of Bhishm, Know About Him
  धृष्टद्युम्न आणि शिखंडी
  युद्ध समाप्त झाल्यानंतर पांडवांच्या शिबिरात घुसुन अश्वत्थामाने द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्नचा वध केला. त्यानंतर अश्वत्थामाने उत्तमौजा, युधामन्यु, शिखंडी इ. वीरांचाही वध केला. तेव्हा अश्वत्थामाला अडवण्यासाठी द्रौपदीचा मुलगा समोर आला परंतु त्याचाही वध अश्वत्थामाने केला.

Trending