Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Tripurari Purnima On 4 November Saturday

कार्तिक पौर्णिमा : एकच बाण सोडून महादेवाने नष्ट केले होते तीन नगर

जीवनमंत्र डेस्क | Update - Nov 04, 2017, 07:00 AM IST

आज (4 नोव्हेंबर, शनिवार) कार्तिक मासातील पौर्णिमा आहे. धर्म ग्रंथानुसार याच दिवशी महादेवाने

 • Tripurari Purnima On 4 November Saturday
  आज (4 नोव्हेंबर, शनिवार) कार्तिक मासातील पौर्णिमा आहे. धर्म ग्रंथानुसार याच दिवशी महादेवाने तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांच्या त्रिपुरा(नगर)चा नाश केला. त्रीपुरांचा नाश केल्यामुळेच महादेवाचे एक नाव त्रिपुरारी असे पडले. महादेवाने या तिन्ही त्रीपुरांचा नाश कसा केला, ही कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Tripurari Purnima On 4 November Saturday
  असुर बालीची कृपा प्राप्त त्रिपुरासुर क्रूर राक्षस होते. तिन्ही मुले तपश्चर्या करण्यासाठी जंगलात गेले आणि हजारो वर्षांपर्यंत अत्यंत कठोर तप करून त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. तिघांनीही ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने त्यांना वरदान देण्यास नकार दिला आणि त्यांना एखादे असे वरदान मागण्यास सांगितले ज्यामुळे तुमचा मृत्यू सहजासहजी होणार नाही.
  तिघांनीही खूप विचार केल्यानंतर वरदान मागितले - हे प्रभू ! तुम्ही आमच्यासाठी तीन पुरींचे (नगर) निर्माण करा. हे तिन्ही नगर जेव्हा अभिजित नक्षत्रामध्ये एका रेषेत येतील आणि एखादा क्रोधाजित अत्यंत शांत अवस्थेमध्ये असंभव रथ आणि असंभव बाणांच्या मदतीने आम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल तेव्हाच आमचा मृत्यू होईल. ब्रह्मदेव म्हणाले - तथास्तु.

  पुढे वाचा, कोणकोणते तीन नगर निर्माण करण्यात आले...
 • Tripurari Purnima On 4 November Saturday
  वरदानानुसार त्यांना तीन पुरी (नगर) प्रदान करण्यात आले. तारकाक्षसाठी स्वर्णपुरी, कमलाक्षसाठी रजतपुरी आणि विद्युन्मालीसाठी लोहपुरीचे निर्माण विश्वकर्मा यांनी केले. या तिन्ही असुरांना त्रिपुरासुर म्हटले जात होते.
 • Tripurari Purnima On 4 November Saturday
  या तिन्ही भावंडांनी या नगरांमध्ये वास्तव्य करत सातही लोकांमध्ये हाहाकार माजवला. ते जेथेही जात होते तेथील लोकांना त्रास देत होते. एवढेच नाही तर त्यांनी देवतांना सुधा त्यांच्या नगरांमधून पळवून लावले होते. सर्व देवतांनी एकत्रितपणे त्रिपुरासुरांचा सामना केला परंतु त्यांना यश प्राप्त झाले नाही. त्यानंतर सर्व देवता मदतीसाठी महादेवाकडे गेले.
  तेव्हा महादेवाने सांगितले की - मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो आणि तुम्ही पूर्ण प्रयत्न करून पाहा. परंतु सर्व देवता महादेवाचे अर्धे बळ सांभाळण्यात असमर्थ ठरले. तेव्हा महादेवाने स्वतः त्रिपुरासुरचा वध करण्याचा संकल्प केला. सर्व देवतांनी महादेवाला स्वतःचे अर्धे बळ समर्पित केले. त्यानंतर युद्ध करण्यासाठी रथ आणि धनुष्यबाण निर्माण करण्याची तयारी सुरु झाली. या असंभव (अशक्य) रथाचे वर्णन पुराणांमध्ये विस्तृतपणे आढळून येते.
 • Tripurari Purnima On 4 November Saturday
  पृथ्वीलाच महादेवाने रथ बनवले, सूर्य आणि चंद्र चाकं बनले, सृष्टा सारथी बनले, विष्णू बाण, मेरुपर्वत धनुष्य आणि वासुकी त्या धनुष्याची प्रत्यंचा (दोरी) बनले. अशा प्रकारे असंभव रथ तयार झाला आणि संहाराची लीला रचली गेली. महादेव त्या रथावर स्वर झाल्यानंतर सर्व देवतांनी तयार केलेला तो रथासुद्धा डगमगू लागला.
 • Tripurari Purnima On 4 November Saturday
  तेवढ्यात भगवान विष्णू यांनी वृषभ (बैल) बनून रथाला आधार दिला. त्या रथावर स्वार होऊन महादेवाने त्या असुरांच्या नगरांकडे पाहिले आणि पाशुपत अस्त्र सोडून तिन्ही नगर एकत्रितपणे बांधले. त्या अमोघ बाणामध्ये विष्णू, वायू, अग्नी आणि यम चारही समाविष्ट होते. अभिजित नक्षत्रामध्ये हे तिन्ही नगर येताच महादेवाने आपल्या बाणाने सर्व पुरींना जाळून भस्म केले. तेव्हापासून महादेव त्रिपुरांतक बनले.

Trending