Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | true haunted place in india news marathi

10 शापित जागा : जेथे रात्री जाणे धोक्यापेक्षा कमी नाही, चुकूनही जाऊ नका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 16, 2017, 12:16 AM IST

जर तुमचे काळीज मजबूत असले आणि तुम्हाला धाडसी काम करण्याची हौस असली तरीही तुम्ही भारतातील या 10 ठिकाणी जाण्यापूर्वी एकदा अवश्य विचार करा.

 • true haunted place in india news marathi
  जर तुमचे काळीज मजबूत असले आणि तुम्हाला धाडसी काम करण्याची हौस असली तरीही तुम्ही भारतातील या 10 ठिकाणी जाण्यापूर्वी एकदा अवश्य विचार करा. कारण हे सर्व ठिकाण शापित आहेत. येथे रात्रीच्या वेळी घडणाऱ्या घटना तुमचा जीवही घेऊ शकतात.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भातातील या 10 ठिकाणांची खास माहिती....

 • true haunted place in india news marathi
  राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात स्थित असलेलेल्या किराडू मंदिराला राजस्थानचे खजुराहोसुद्धा मानले जाते. हे मंदिर शापित असल्याचे सांगितले जाते. एका साधूने दिलेल्या शापामुळे रात्र झाल्यानंतर या मंदिरात कोणीही थांबत नाही. येथे रात्री थांबणारा व्यक्ती दगड बनतो किंवा त्याचा मृत्यू होतो असे मानले जाते.
 • true haunted place in india news marathi
  दर्जालिंग येथील एक हिल स्टेशन कुर्सियांग. इंग्लिशमध्ये 'कर्स' चा अर्थ शाप असा होतो. या शब्दावरूनच या ठिकाणाचे नाव कुर्सियांग म्हणजे शापित ठिकाण असे पडले आहे. या गोष्टीचे सत्य येथे आल्यानंतरच समजते. स्थानिक मान्यतेनुसार येथील जंगलात शीर (डोके) नसलेला एक व्यक्ती फिरतो. रात्रीच्या वेळी डाउ हिल जंगलात जाणे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे मानले जाते. डाउ ह‌िल व्यतिरिक्त येथेइल इतर ठिकाणही हॉंटेड मानले जातात. यामुळे येथे फिरायला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका.
 • true haunted place in india news marathi
  राजस्थानातील अलवर जिल्ह्यात स्थित आहे भानगढचा किल्ला. या किल्ल्याला काही लोक प्रेत बाधित तर काहीजण तंत्रीकाने दिलेला शाप मानतात. कारण काहीही असो, परंतु हा किल्ला आजही एक गूढ आहे. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या किल्ल्यात रात्री प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. यामागे नेमकं काय कारण हे कोणालाही माहिती नाही, परंतु रात्रीच्या वेळी येथे जाणे धोक्यापेक्षा कमी नाही.
 • true haunted place in india news marathi
  महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यात हरंगुळ नव्हे एक गाव आहे. येथे 15 व्या शतकापासून काळ्या जादूने हडळ बनवण्याची प्रथा सुरु झाली. आजही हे गाव हडळेच्या सावटाखाली आहे. आजही येथे रात्रीच्या वेळी अनेक कार्य करण्यास मनाई आहे. येथील कोणताच व्यक्ती रात्रीच्या वेळी झाडाच्या जवळपास झोपत नाही. झाडामध्ये खिळा ठोकणे आणि मुत्र विसर्जन करणे वर्ज्य आहे. असे केल्यास हडळ त्या व्यक्तीची वाईट अवस्था करते असे मानके जाते.
 • true haunted place in india news marathi
  जैसलमेरपासून 18 किलोमीटर अंतरावर वसलेले कुलधारा गाव शापित आहे. हे गाव 1825 पासून उजाड आहे. असे सांगितले जाते की, पालीवाल ब्राह्मणांनी या गावाला पुन्हा येथे कधीही वस्ती दिसणार नाही असा शाप दिला आहे. तेव्हापासून हे गाव उजाड आहे. जवळपास राहणारे स्थानिक सांगतात की, या गावामध्ये रात्री भूत-प्रेत आणि इतर विचित्र आवाज ऐकू येतात. यामुळे या गावात रात्री कोणीही जात नाही.
 • true haunted place in india news marathi
  ही आहे आसाममधील जट‌िंगा व्हॅली. या ठिकाणाचे रहस्य कोणालाही माहिती नाही परंतु येथे एक विचित्र घटना घडते. रात्रीच्या वेळी येथे पक्षी येउन आत्महत्या करतात. येथे तुम्हाला सर्वठिकाणी मृत पक्षी आढळून येतील.
 • true haunted place in india news marathi
  हे आहे मथुरेतील निधीवन. स्थानिक मान्यतेनुसार आजही येथे भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधा गवळणींसोबत रासक्रीडा करतात. यामुळे रात्र झाल्यानंतर या वनाचे दरवाजे बंद केले जातात. पशु-पक्षीसुद्धा वनातून निघून जातात. असे मानले जाते की, या ठिकाणी रात्री थांबणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा तो वेडा होतो.
 • true haunted place in india news marathi
  मध्यप्रदेशातील पोहरी गावात 2100 वर्षांपूर्वीचा वीर खंडेराव यांचा एक किल्ला आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या किल्ल्यातून रात्री घुंगरांचा आवाज येतो. असे सांगितले जाते की, रात्रीच्या वेळी किल्ल्या खंडेरावांची सभा भरते आणि यामध्ये नर्तकींचे नृत्य होते. यामुळे रात्र झाल्यानंतर लोक या किल्ल्याजवळ येत नाहीत.
 • true haunted place in india news marathi
  कालींजरच्या किल्ल्याबद्दल सांगितले जाते की, येथेसुद्धा एक सुंदर नर्तकी पद‍्मावतीच्या घुंगरांचा आवाज येतो.
 • true haunted place in india news marathi
  हे आहे उत्तराखंडमधील रूपकुंड. येथे तुम्हाला सर्वठिकाणी नर कंकाळ दिसतील. येथे रात्रीच नाही तर दिवसासुद्धा जाण्याचे कोणाचेही धाडस होत नाही.

Trending