Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | tulas shaligram viviah story

का केला जातो तुळस-शाळीग्राम विवाह? ही आहे रोचक कथा

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 31, 2017, 12:42 PM IST

हिंदू धर्मात अनेक मान्यता आणि परंपरा प्रचलित आहेत. अशीच एक परंपरा म्हणजे दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशी

  • tulas shaligram viviah story
    हिंदू धर्मात अनेक मान्यता आणि परंपरा प्रचलित आहेत. अशीच एक परंपरा म्हणजे दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशी (31 नोव्हेंबर, मंगळवार)ला करण्यात येणारा तुळशी शाळीग्राम विवाह. दरवर्षी श्रद्धाळू तुळस-शाळीग्राम विवाह करतात. तुळसी विवाह केल्याने माणूस सुखी होतो. समृद्धी येते. तुळसी शाळीग्राम विवाहासंदर्भात शिव महापुराणात एक आख्यायिका आहे.

    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुळशी-शाळीग्राम विवाह का केला जातो...
  • tulas shaligram viviah story
    प्राचीन काळी शंखचूड नावाचा एक पराक्रमी राक्षस होता. या राक्षसाचे लग्न वृंदा नावाच्या एका मुलीशी झाले. वृंदा भगवान विष्णूची भक्त होती. वृंदाच्या पतिव्रता धर्मामुळे शंखचूड अजेय झाला होता. या राक्षसाने एका युद्धामध्ये महादेवालाही पराभूत केले होते. या गोष्टीचा शंखचूडला खूप अहंकार आणि गर्व झाला होता. तो स्वर्गातील देवतांना, अप्सरांना त्रास देवू लागला. दुःखी होऊन सर्व देवता भगवान विष्णूला शरण गेले आणि शंखचूडच्या त्रासातून मुक्त करण्याची प्रार्थना करू लागले.

    भगवान विष्णू यांनी आपल्या माया शक्तीने शंखचूडचे रूप धारण केले. माया शक्तीने त्यांनी वृंदाचा पतिव्रता धर्म नष्ट केला. यामुळे शंखचूडची शक्ती क्षीण झाली. युद्धामध्ये तो मृत्युमुखी पडला. जेव्हा वृंदाला भगवान विष्णूच्या छळ-कपाटाबद्दल समजले तेव्हा तिने विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. देवतांच्या प्रार्थनेनंतर वृंदाने शाप परत घेतला, परंतु भगवान विष्णू वृंदासोबत केलेल्या छळ-कपाटामुळे स्वतःला दोषी समजत होते. त्यांनी वृंदाच्या शापाचा मान ठेवण्यासाठी स्वतःचे एक रूप दगडामध्ये प्रकट केले. या दगडातील रुपाला शाळिग्राम म्हटले जाते.
  • tulas shaligram viviah story
    भगवान विष्णूने वृंदाला सांगितले की, पुढील जन्मात तू तुळशीच्या रुपात प्रकट होशील आणि लक्ष्मीपेक्षा मला जास्त प्रिय राहशील. तुझे स्थान माझ्या डोक्यावर असेल. मी तुझ्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही. याच कारणामुळे भगवान विष्णूच्या प्रसादामध्ये तुळशीचे पान अवश्य टाकले जाते. तुळस न टाकलेला प्रसाद भगवान विष्णू स्वीकार करत नाहीत. भगवान विष्णूला दिलेला शाप परत घेतल्यानंतर वृंदा जलंधरसोबत सती झाली. वृंदेच्या राखेमधून तुळशीचे रोप बाहेर आले. वृंदाची मर्यादा आणि पवित्रता कायम ठेवण्यासाठी देवतांनी भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपाचे लग्न तुळशीसोबत केले.
  • tulas shaligram viviah story
    याच कारणामुळे भगवान विष्णू आणि तुळस कोणत्याही ठिकाणी असल्यास दुःख, अडचणी, त्रासामधून मुक्ती मिळते. नारायण स्वरूप हेच शाळीग्राम दगड विष्णूच्या वेगवेगळ्या रूप आणि अवतारांच्या नावाचे असतात. हे खूप चमत्कारिक दगड मानले गेले आहेत. या दगडांना केवळ स्पर्श केला तरी प्रत्येक कामात यश मिळते.

Trending