Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | vishwamitra and menaka story

इंद्रदेवाच्या आदेशावरून या अप्सरेने भंग केले या महान ऋषींचे तप

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 09, 2017, 02:44 PM IST

जंगलामध्ये कठोर तपश्चर्येत लीन झालेले एक ऋषी बसले होते. चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज, शरीरात कोणत्याही प्रकराची हालचाल नाही

 • vishwamitra and menaka story
  जंगलामध्ये कठोर तपश्चर्येत लीन झालेले एक ऋषी बसले होते. चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज, शरीरात कोणत्याही प्रकराची हालचाल नाही. जवळपास प्राण्यांचा वावर, पक्षी चिवचिवाट करत होते, परंतु त्या ऋषींचे तप भंग करण्याचे धाडस कोणामध्येही नव्हते. ते होते अत्यंत प्रतापी आणि महान ऋषी 'विश्वामित्र'.

  कोणीतरी विश्वामित्रांच्या या तपाची सूचना इंद्रलोकचे राजा इंद्रदेव यांना दिली. इंद्रदेव, ऋषी विश्वामित्र यांचे तप पाहून चिंताग्रस्त झाले. चिंतेसोबतच त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली. एक अशी भीती जी त्यांचे अस्तित्वच नष्ट करू शकत होती. आपल्या कठोर तपश्चर्येने ऋषी विश्वामित्र एक नव्या विश्वाची स्थापना करण्याच्या प्रयत्नात होते. इंद्रदेवाला अशी भीती होती की, विश्वामित्र तपश्चर्येत यशस्वी झाले तर तेच स्वतः सर्व सृष्टीचे देवता होतील.

  पुढे जाणून घ्या, इंद्रदेवाने विश्वामित्राचे तप भंग करण्यासाठी काय केले....

 • vishwamitra and menaka story
  खूप विचार करूनही इंद्रदेवाला काय करावे ते सुचेना. कारण ऋषी आपल्या तपश्चर्येत एवढे मग्न झाले होते की, त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी कोणीही समर्थ नव्हते. इंद्रदेवाने ऋषींचे तप भंग करण्यासाठी एक योजना आखली. योजना होती ऋषी विश्वामित्र यांचे तप भंग करण्याची, परंतु कसे?
 • vishwamitra and menaka story
  एका पौराणिक वर्णनानुसार देवराज इंद्रने मेनका नावाच्या अप्सरेला सभेमध्ये आमंत्रित केले. इंद्रदेवाने तिला नारीचे शरीर धारण करून मृत्यूलोकात राहण्यास सांगितले. तेथे जाऊन आपल्या सौंदर्याच्या जोरावर ऋषी विश्वामित्र यांना आकर्षित करून त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा आदेश दिला.
 • vishwamitra and menaka story
  आदेशानुसार अप्सरा मेनका, जी इंद्रलोकातील सर्व अप्सरांमधील सर्वात सुंदर, नृत्य-गाण्यात तरबेज आणि आकर्षणाचे केंद्रबिंदू होती. ती ऋषी विश्वामित्र यांच्यासमोर प्रकट झाली. विश्वामित्र ऋषींना तपश्चर्येत मग्न पाहून अप्सरा विचार करू लागली की, आपण असे काय केले तर ऋषी आपल्याकडे आकर्षित होतील. ती एक अप्सरा होती, परंतु आता विश्वामित्र ऋषींसाठी तिने एका नारीचे रूप धारण केले होते.
 • vishwamitra and menaka story
  तिच्यामध्ये नारी रुप धारण केल्यानंतर ते सर्व गुण होते, जे मृत्युलोकातील एका स्त्रीमध्ये असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त मेनका सौंदर्याची राणी आकर्षणाचे केंद्र होती परंतु ऋषींचे तप भंग करणे सहजसोपे काम नव्हते. परंतु इंद्रदेवाच्या आदेशाचे पालन करून देवलोकात स्वतःचे स्थान आणखी मोठे करून घेण्याची ही संधी मेनका सोडू शकत नव्हती. यामुळे तिने ऋषी विश्वामित्र यांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला.
 • vishwamitra and menaka story
  योग्य संधी मिळताच ती ऋषींच्या डोळ्यांचे केंद्र बनत होती तर कधी जाणीवपूर्वक हवेच्या लहरीवर अंगावरील वस्त्र उडू देत होती. ज्यामुळे ऋषी विश्वामित्रांची दृष्टी तिच्यावर पडेल. परंतु विश्वामित्र ऋषींचे शरीर तपश्चर्येमुळे कठोर झाले होते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भावना उरली नव्हती, परंतु अप्सरेच्या अथक प्रयत्नांमुळे हळू-हळू ऋषींच्या शरीरात बदल होऊ लागले होते. कामाग्नीची प्रतिक मेनकाच्या नृत्य आणि संगीताने महर्षींच्या शरीरामध्ये कामशक्तीचे स्फुलिंग स्फुरित होऊ लागले होते.
 • vishwamitra and menaka story
  आणि एक वेळ अशी आली की, सृष्टीला बदलण्याच्या दृढ निश्चयाने तपश्चर्येला बसलेले विश्वामित्र उठून उभे राहिले. आता ते सृष्टी निर्माणाच्या निर्णय मागे टाकून त्या स्त्रीच्या प्रेमात अडकले होते. जी एक अप्सरा होती.
 • vishwamitra and menaka story
  सत्यापासून अनभिज्ञ ऋषी त्या स्त्रीला स्वतःच्या अर्धांगिनी स्वरुपात पाहू लागले होते. ऋषी विश्वामित्र यांचे तप भंग झाले होते, परंतु तरीही मेनका इंद्रलोकात परत गेली नाही. कारण असे केल्यामुळे ऋषी पुन्हा तपश्चर्या सुरु करतील. यामुळे तिने आणखी काही वर्ष तेथेच राहण्याचा निश्चय केला. अनेक दिवस सोबत राहिल्यामुळे त्या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. परंतु मेंकाच्या मनात प्रेमासोबतच एक चिंता होती, ती म्हणजे इंद्रलोकाची.
 • vishwamitra and menaka story
  तिला माहिती होते की, तिच्या अनुपस्थितीमध्ये अप्सरा उर्वशी, रंभा इ. इंद्रलोकाचा आनंद उपभोगत असतील. दिवस महिन्यांमध्ये बदलत गेले आणि एके दिवशी मेनकाने ऋषी विश्वामित्र यांच्या अपत्याला जन्म दिला. ती एक मुलगी होती. मुलीला जन्म दिल्यानंतर काही काळाने एका रात्री मेनका परत इंद्रलोकात गेली. या मुलीला नंतर ऋषी विश्वामित्र यांनी कण्व ऋषींच्या आश्रमात सोडून दिले.
 • vishwamitra and menaka story
  ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका यांची ही मुलागी पुढे चालून 'शकुंतला' नावाने ओळखली जाऊ लागली. या मुलीचा पुढे चालून सम्राट दुष्यंतशी प्रेम विवाह झाला. यांना 'भरत' नावाच्या एका मुलाची प्राप्ती झाली. याच मुलाच्या नावावरून भारत देशाचे नाव विख्यात झाले.

Trending