Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Who Is Jarasandh, Know About Him

2 भागांमध्ये जन्मला होता हा राजा, असा झाला मृत्यू

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 27, 2017, 10:00 AM IST

महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथामध्ये विविध महारथी व बलशाली राजांचे वर्णन करण्यात आले आहे.

 • Who Is Jarasandh, Know About Him
  महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथामध्ये विविध महारथी व बलशाली राजांचे वर्णन करण्यात आले आहे. असाच एक महारथी राजा होता जरासंध. त्याच्या जन्म आणि मृत्यूची कथा खूपच रंजक आहे. जरासंध मगध (वर्तमान बिहार)चा राजा होता. तो इतर राजांना बंदी बनवून आपल्या पर्वतावरील उंच किल्ल्यात डांबून ठेवत होता. जरासंध अत्यंत क्रूर होता. बंदी राजांचा वध करून त्याला चक्रवर्ती सम्राट व्हायचे होते. भीमाने 13 दिवस कुस्ती लढल्यानंतर जरासंधला पराभूत करून त्याचा वध केला होता.

  100 राजांचा वध करण्यास होत इच्छुक
  जरासंध महादेवाचा परम भक्त होता. त्याने आपल्या पराक्रमाने 86 राजांना बंदी केले होते. बंदी राजांना त्याने किल्ल्यात डांबून ठेवले होते. चक्रवर्ती सम्राट बनण्यासाठी जरासंध 100 बंदी बनवून त्यांचा बळी देण्यास इच्छुक होता.

  जरासंधशी संबंधित इतर रंजक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..

 • Who Is Jarasandh, Know About Him
  कंसाचा सासरा होता जरासंध
  जरासंध मथुरेचा राजा कंसचा सासरा आणि जवळचा मित्र होता. त्याच्या दोन्ही मुली आसीत आणि प्रापितचे लग्न कंसासोबत झाले होते. श्रीकृष्णाकडून कंसाच्या वधाचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याने 17 वेळेस मथुरेवर आक्रमण केले होते, परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी झाला. जरासंधच्या भीतीमुळे अनेक राजे-महाराजे आपल्या राज्य सोडून पळून गेले होते. शिशुपाल जरासंधच्या सैन्याचा सेनापती होता.
 • Who Is Jarasandh, Know About Him
  असा झाला होता जरासंधचा जन्म -
  मगध देशात बृहद्रथ नावाचा एक राजा होता. त्याच्या दोन पत्नी होत्या, परंतु त्यांना एकही मुलबाळ नव्हते. एके दिवशी पुत्र प्रतीच्या इच्छेने राजा बृहद्रथ ऋषी चण्डकौशिक यांच्याकडे गेला आणि सेवा करून त्यांना संतुष्ट केले. प्रसन्न होऊन ऋषी चण्डकौशिक यांनी राजाला एक फळ दिले आणि ते फळ पत्नीला खाऊ घालण्यास सांगितले. राजाने ते फळ कापून दोन्ही पत्नींना खाऊ घातले. काही काळानंतर दोन्ही पत्नींच्या गर्भामधून शिशूच्या शरीराचा एक-एक तुकडा जन्माला आला. दोन्ही राण्यांनी शिशूच्या दोन्ही जिंवत तुकड्यांना घाबरून बाहेर फेकून दिले. त्याचवेळी तेथून एक राक्षसीण जात होती. तिचे नाव जरा होते. तिने बाळाचे जिवंत तुकडे पाहिल्यानंतर ते मायावी शक्तीने जोडले. दोन्ही तुकडे एकत्र होताच एक शरीर तयार झाले.

  त्यानंतर ते बाळ रडू लागले. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून दोन्ही राण्या बाहेर आल्या आणि त्यांनी बाळाला जवळ घेतले. राजा बृहद्रथ तेथे आले आणि त्यांनी राक्षसीणीला परिचय विचारला. राक्षसीणीने राजाला सर्व घटना सांगितली. राजा तिच्यावर खूप प्रसन्न झाला आणि त्याने बालकाचे नाव जरासंध ठेवले. कारण जरा नावाच्या राक्षसीणीने त्याला संधीत (जोडून) केले होते.
 • Who Is Jarasandh, Know About Him
  भीमाने असा केला जरासंधचा वध -
  जरासंधचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने एक योजना तयार केली. योजनेनुसार श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन ब्राह्मणाचा वेश धारण करून जरासंधकडे गेले आणि त्याला कुस्तीसाठी बोलावले. जरासंधला समजे की, हे ब्राह्मण नाहीत. जरासंधच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाने स्वतःचा परिचय दिला.

  जरासंध भीमासोबत कुस्ती खेळण्यासाठी तयार झाला. राजा जरासंध आणि भीम यांचे युद्ध कार्तिक कृष्ण प्रतिपदेपासून सलग 13 दिवस चालू राहिले. चौदाव्या दिवशी भीमाने श्रीकृषणाचा संकेत समजून जरासंधच्या शरीराचे दोन तुकडे केले. जरासंधचा वध झाल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांच्या बंधनात असलेल्या सर्व राजांना मुक्त केले आणि सांगिलते की धर्मराज युधिष्ठीर चक्रवर्ती पद प्राप्त करण्यासाठी राजसूय यज्ञ करू इच्छित आहेत. तुम्ही सर्वजण त्यांची मदत करा. सर्व राजांनी श्रीकृष्णाचा हा प्रस्ताव मान्य केला आणि धर्मराज युधिष्ठीरला राजा घोषित केले. भगवान श्रीकृष्णाने जरासंधचा मुलगा सहदेवला अभयदान देऊन मगध देशाचा राजा घोषित केले.

Trending