Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Why Use Coppers Pot In Worship Know The Story

या राक्षसाच्या मांसापासून बनले आहे तांबे, पुराणात आहे ही कथा

जीवनमंत्र डेस्क | Update - Nov 08, 2017, 11:23 AM IST

हिंदू धर्मामध्ये देव पुजेशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. यामधील एक नियम असाही आहे की पूजेचे पात्र

  • Why Use Coppers Pot In Worship Know The Story
    हिंदू धर्मामध्ये देव पुजेशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. यामधील एक नियम असाही आहे की पूजेचे पात्र म्हणजे भांडे तांब्याचे असावे. विद्वानांच्या मते तांब्यापासून निर्मित भांडे पूर्णपणे शुद्ध असतात. कारण यामध्ये इतर धातूचा उपयोग होत नाही. यामुळे तांब्याच्या भांड्यांचा उपयोग पूजेमध्ये करणे श्रेष्ठ राहते. या संदर्भातील एक कथा वराह पुराणात आढळून येते.

    कथा वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

  • Why Use Coppers Pot In Worship Know The Story
    वराह पुराणानुसार, प्राचीन काळी गुडाकेश नावाचा एक राक्षस होता. हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता. त्याच्या तपश्चर्येवर भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्याला वरदान मागण्यात सांगितले. गुडाकेशने भगवान विष्णूंना सांगितले की- तुमच्या सुदर्शन चक्राने माझा मृत्यू व्हावा आणि माझे संपूर्ण शरीर तांब्यामध्ये रूपांतरित व्हावे. या तांब्याचा उपयोग तुमच्या पूजेसाठी लागणाऱ्या पात्र स्वरूपात व्हावा आणि या भांड्याचा वापर करून करण्यात आलेल्या पूजेने तुम्ही प्रसन्न व्हावे. यामुळे तांबे अत्यंत पवित्र धातू बनेल.

    भगवान विष्णूने गुडाकेशला वरदान दिले आणि योग्य वेळ आल्यानंतर चक्राने त्याच्या शरीराचे तुकडे केले. गुडाकेशच्या मांसापासून तांबे, रक्तापासून सोने आणि हाडांपासून चांदीचे निर्माण झाले.

Trending