धर्म ग्रंथानुसार भाद्रपद मासातील शुक्ल अष्टमी ( 2 सप्टेंबर, मंगळवार) पासून महालक्ष्मीचे व्रत सुरु झाले आहे. हे व्रत 16 दिवस (16 सप्टेंबर, मंगळवार) असते. तंत्र शास्त्रानुसार हे 16 दिवस धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ मानले गेले आहेत. या 16 दिवसांमध्ये काही खास उपाय केल्यास किंवा काही विशेष वस्तू घरामध्ये ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्तावर
आपली कृपा दृष्टी ठेवते. तुम्हालाही या संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर येत सांगण्यात आलेले उपाय अवश्य करा...
- महालक्ष्मी व्रताच्या दरम्यान कोणत्याही संध्याकाळी लक्ष्मीची विधीव्रत पूजा करून लक्ष्मीच्या चरणाजवळ सात लक्ष्मीकारक कवड्या ठेवा. मध्यरात्रीनंतर या कवड्या घरातील एखाद्या कोपऱ्यात पुरून टाका. या उपायाने लवकरच आर्थिक उन्नती होईल.
- जुने चांदीचे शिक्के आणि पैशासोबत कवड्या ठेवून लक्ष्मी पूजनाच्या वेळी यांची केशर आणि हळदीने पूजा करा. पूजा केल्यानंतर या वस्ती तिजोरीत ठेवा. यामुळे तिजोरीतील धन वाढू शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)