आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Ways To Worship Lord Shiv For Fulfill Desire Quickly

शिवपुराण : जाणून घ्या, इच्छापूर्ती करणारे शिव भक्तीचे 5 खास उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनातन धर्मामध्ये महादेवाला वेद किंवा ज्ञान स्वरूप मानण्यात आले आहे. यामुळे शिव भक्ती मनाची चंचलता थांबवून व्यक्तीला दुःख आणि दुर्गतीपासून वाचवणारी मानली गेली आहे. महादेवाच्या प्रसन्नतेसाठी धर्म आणि लोक प्रथांमध्ये अभिषेक, पूजा व मंत्र जप इ. कर्म केले जातात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, तन, मन आणि वचन स्तरावर खरी शिव भक्ती, उपासना, साधना आणि सेवा करण्याचे योग्य विधान कोणते आहे? याचे उत्तर शिवपुराणामध्ये मिळते, ज्यामध्ये शिव सेवेला 'शिव धर्म' असे सांगण्यात आले आहे. जाणून घ्या, शिव भक्ती आणि सेवेचे पाच खास उपाय.
शिवपुराणानुसार भक्तीचे तीन रूप आहेत. यामधील पहिले रूप मानसिक म्हणजे मनाने, दुसरे रूप वाचिक म्हणजे वाणीने आणि तिसरे रूप शारीरिक म्हणजे शरीराने. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास तन, मन आणि वचनाने देव भक्ती करणे. यामध्ये महादेव स्वरूपाचे चिंतन मनाने, मंत्र आणि जप वचनाने आणि पूजा परंपरा शरीराने सेवा मानण्यात आली आहे. या तीन पद्धतीने करण्यात येणारी सेवा शिव धर्म संबोधली जाते. या शिव धर्म किंवा शिव सेवेचेसुद्धा पाच प्रकार आहेत, जे शिव भक्तीचे 5 सर्वात चांगले उपाय मानले जातात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शिव भक्ती आणि सेवेचे पाच खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)