आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय तृतीया : लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा अचूक योग, या उपायांनी होईल धनलाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2 मे, शुक्रवारी अक्षय तृतीयेचा सण आहे. हे स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. या दिवसला सौभाग्य दिवसही म्हटले जाते. यामागचे कारण म्हणजे संपूर्ण वर्षात कोणतीही तिथी क्षय होऊ शकते परंतु ही तिथी म्हणजे वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीचा कधीही क्षय होत नाही. यामुळे या दिवशी करण्यात येणार्या होम-हवन, यज्ञ, जप, साधनेचे फळ अक्षय(संपूर्ण) राहते.

यावर्षी अक्षय तृतीया हा सण शुक्रवारी आल्यामुळे याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे, कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. तंत्र शास्त्रानुसार या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय केल्यास साधकाच्या सर्व अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे सोपे उपाय...

1- अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी लक्ष्मीची विधिव्रत पूजा करून त्यानंतर देवीजवळ सात लक्ष्मीकारक कवड्या ठेवा. मध्यरात्री या कवड्या घरातील एखाद्या कोपर्यात पुरून टाका. या उपायाने लवकरच आर्थिक उन्नती होईल.

2- चांदीचे नाणे आणि पैशांसोबत कवड्या ठेवून लक्ष्मी पूजनाच्या वेळी त्या कवड्यांची हळद आणि केशराने पूजा करा. पूजा झाल्यानंतर या कवड्या तिजोरीत किंवा धनस्थानावर ठेवा. या उपायाने तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील.

इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...