आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, मातीच्या छोट्या-छोट्या पाच शिवलिंग पूजेचा शिवपुराणातील उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या महादेवाला प्रिय असणारा श्रावण महिना सुरु असून या महिन्यात शिव पूजेचे विशेष महत्त्व आहे. शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमधील एक उपाय मातीचे छोटे-छोटे शिवलिंग तयार करून त्यांची पूजा करणे. येथे जाणून घ्या, या उपायाचा सोपा विधी.

उपाय - श्रावण महिन्यात कोणत्याही शुभ मुहूर्तावर मातीचे पाच शिवलिंग तयार करून त्यांची विधिव्रत पूजा करा. पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करून घेतल्यास श्रेष्ठ राहील. पूजा झाल्यानंतर हे पाचही शिवलिंग एखद्या नदीमध्ये किंवा तलावात विसर्जित करा किंवा पूजा झाल्यानंतर पाचही शिवलिंग पाण्यामध्ये विरघळवून ते पाणी एखाद्या झाडाच्या कुंडीत टाकू शकता. या उपायने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

- शास्त्रानुसार मातीचे 11 शिवलिंग तयार करून पूजा केल्यास सर्व पापामधून मुक्ती होते.

- मातीचे 1000 शिवलिंग तयार करून त्यांचे पूजन केल्यास व्यक्तीला सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात तसेच त्याला शिवलोकात स्थान मिळते.

पुढे जाणून घ्या, श्रावण महिन्यातील इतर काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)