आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव दिवाळी : लक्ष्मी कृपेसाठी संध्याकाळी करू शकता हे उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज कार्तिक मासातील पौर्णिमा आहे. शास्त्रानुसार या तिथीला देव दिवाळी म्हणतात. या तिथीपूर्वी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे देवउठनी एकादशीला भगवान विष्णू झोपेतून जागे झाले आहेत. धार्मिक मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी भगवान विष्णूच्या अगोदर निद्रेतून उठते. पौर्णिमेला दीपदान आणि नदीमध्ये स्नान करण्याची प्राचीन प्रथा आहे. देशातील सर्व पवित्र नद्यांमध्ये श्रद्धाळू स्नान करून दीपदान करतात. येथे जाणून घ्या, कार्तिक मासातील पौर्णिमेला लक्ष्मी कृपा प्राप्त करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जातात....

कार्तिक पौर्णिमेला झाला मत्स्यावतार
प्राचीन काळी या तिथीला भगवान विष्णू यांचा मत्स्य अवतार झाला होता. पृथ्वीवर प्रलयकाळ आल्यानंतर भगवान विष्णूंनी सृष्टीच्या रक्षणासाठी मत्स्य रुपात अवतार घेतला होता. यामुळे कार्तिक पौर्णिमेला करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होतात.

- या पौर्णिमेला भगवान विष्णूंचे पूजन करणे, पितरांसाठी कल्याणकारी राहते. या तिथीपासून थंडीमध्ये वाढ होऊ लागते तसेच दिवस छोटा आणि रात्र मोठी होते.

- संध्याकाळच्या वेळी मंदिर, चौक, पिंपळाचे झाड आणि तुळशीजवळ दिवा लावावा. या उपायाने लक्ष्मी प्रसन्न होते.

पुढे जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)