मंगळवारी करा हनुमानाच्या / मंगळवारी करा हनुमानाच्या या 9 उपायांमधील 1 उपाय, सर्व अडचणी दूर होतील

धर्म डेस्क

Dec 11,2013 11:47:00 AM IST

शास्त्रानुसार हनुमानाच्या जन्म मंगळवारी झाला आहे आणि याच कारणामुळे आजही या दिवशी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. धर्मशास्त्रानुसार, कलियुगात श्रीरामाचे निस्सीम भक्त हनुमानाची उपासना केल्याने सर्वश्रेष्ठ फळ प्राप्त होते असे मानले जाते.

हनुमानाची उपासना केल्याने सर्व प्रकारचे दु:ख दूर होतात. जर तुम्हाला एखादी किंवा अनेक अडचणी असतील तर तुम्ही मंगळवारी हनुमानाची पूजा करून सर्व अडचणी दूर करू शकता. पुढे दिलेले उपाय तुमच्या यशाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतील.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

मंगळवारी सकाळी पिंपळाच्या झाडाचे ११ पानं तोडून आणा. गंगाजलामध्ये पानं पवित्र करून घ्या. या पानांवर केशराने श्रीराम लिहा. या पानांची एक माळ तयार करा आणि हनुमानाला अर्पण करा. हा उपाय केल्याने धनप्राप्ती होईल.मंगळवारी कोणत्याही हनुमान मंदिरात नारळ घेऊन जा. मंदिरात गेल्यानंतर स्वतःवरून सात वेळेस नारळ उतरवून घ्या. त्यानंतर हे नारळ हनुमानासोर फोडा. या उपायने सर्व बाधा नष्ट होतील.हनुमानाला तेल अर्पण करावे आणि शेंदूर लावावा. जो व्यक्ती हनुमानाला तेल अर्पण करतो आणि शेंदूर लावतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.हनुमानाच्या मंदिरात जाऊन एका नारळावर स्वतिक काढून ते नारळ अर्पण करा. हनुमान चाळीसाचे पाठ करावेत.हनुमानासमोर रात्री चार वातींचा दिवा लावावा. हा एक खूपच छोटा परंतु चमत्कारिक उपाय आहे. हा उपाय नियमित केल्यास घातील सर्व अडचणी दूर होतीलएखाद्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि सात प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर झाडाखाली बसून हनुमान चाळीसाचे पाठ करावेत.आपल्या श्रद्धेनुसार एखाद्या हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला लाल वस्त्र अर्पण करावे. हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.श्रीरामरक्षा स्तोत्राचे पाठ हनुमान मंदिरात बसून करावेत. हा उपाय केल्यास लवकरच चमत्कारिक फळ प्राप्त होईल.लहान मुलांना कोणाची वाईट दृष्ट लागली असेल किंवा घरावर कोणी करनी केली असेल तर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. हनुमान मूर्तीच्या उजव्या पायावरील शेंदूर पिडीत व्यक्तीच्या कपाळावर लावा. तुमची समस्या दूर होईल.
X