आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या स्त्रीला दान करावे सौभाग्याचे सामान, प्राप्त होते लक्ष्मी कृपा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला पूर्ण सुख-सुविधा प्राप्त होत नाहीत. तसेच वैवाहिक जीवनातही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुक्र ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी शुक्रवारी विशेष उपाय केले जाऊ शकतात. शास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. येथे जाणून घ्या, शुक्रवारी करण्यात येणारे 5 छोटे-छोटे उपाय...

1. शुक्रवारी एखाद्या लग्न झालेल्या स्त्रीला सौभाग्याचे सामान दान करावे. सौभाग्याचे सामान म्हणजे, बांगड्या, कुंकू, लाल साडी इ. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
2. प्रत्येक शुक्रवारी शिवलिंगावर दुध अर्पण करावे. ऊँ नम: शिवाय मंत्राचा कमीतकमी 108 वेळेस जप करावा. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करावा.
3. एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा मंदिरात दुध दान करावे.
4. शुक्र ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी शुक्र मंत्राचा जप करावा. मंत्र जपची संख्या 108 ठेवावी. शुक्र मंत्र द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:।
5. शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या वस्तूंचे दान करू शकता. हिरा, चांदी, तांदूळ, खडीसाखर, पांढरे वस्त्र, पांढरे चंदन.
बातम्या आणखी आहेत...