मृत्युनंतर काय घडते? एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा लगेच दुसरे शरीर धारण करतो का त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी यमलोकात नेले जाते. मृत्यूशी संबधित असे विविध रहस्य जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, परंतु ही इच्छा पूर्ण होत नाही. मृत्यूशी संबधित ही जिज्ञासा शांत करण्यासाठी हिंदू धर्म ग्रंथामध्ये मृत्यू आणि त्यानंतरच्या जीवनाशी संबंधित रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुराणांमध्ये ज्या कथा आढळून येतात त्यानुसार यमाचे दूत खूपच भयावह आणि निर्दयी असतात.
मृत्युच्या वेळी जेव्हा हे दूत आत्म्याला घेण्यासाठी येतात तेव्हा यांना पाहताच मारणारा व्यक्ती भित्ने थरथर कापू लागतो. शरीरातून प्राण काढून घेतल्यानंतर दूत आत्मा पाशामध्ये बांधतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या यातना देत आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. एका सोप्या उपायाचे नियमित पालन केल्यास यमदूत तुमच्याजवळ येण्यासही घाबरतील. यमदूत तुमच्याजवळ आले तरी तुम्हाला कष्ट देऊ शकणार नाहीत, उलट त्यांनाच कष्ट सहन करावे लागतील. असा उल्लेख भविष्य पुराणात करण्यात आला आहे.
भविष्य पुराणानुसार, ब्रह्मदेव वासुदेवांना सूर्य पूजेचे महत्त्व सांगताना म्हणतात की, जो व्यक्ती नियमितपणे सूर्यदेवाची पूजा करतो त्याच्यावर यमदेवाची कृपा राहते. ब्रह्मदेव सांगतात की, यमदेवाने दूतांना आदेश दिला आहे की, जो व्यक्ती सूर्यदेवाला नियमितपणे दुध आणि तूप अर्पित करत असेल त्याच्याजवळ यमदूतांनी जाऊ नये.
पुढे वाचा, सूर्यदेवाची उपासना करणार्या व्यक्तीला यमदूत का त्रास देत नाहीत...