आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhishma Ashtami Know Significance And Method Of This Fast

भीष्म अष्टमी आज : या व्रताने प्राप्त होते गुणवान आपत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माघ मासातील शुक्ल पक्ष अष्टमीला भीष्म अष्टमी म्हणतात. या तिथीला व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी 27 जानेवारी, मंगळवारी हे व्रत करावे. धर्म शास्त्रानुसार या दिवशी भीष्म पितामह यांनी सूर्य उत्तरायण झाल्यानंतर प्राणत्याग केला होता.

त्यांच्या निमीत्त हे व्रत केले जाते. या दिवशी प्रत्येक हिंदूने भीष्म पितामह निमित्त कुश, तीळ व पाणी हातामध्ये घेऊन तर्पण करावे, आई-वडील जीवन असले तरीही हे तर्पण करावे. हे व्रत केल्याने मनुष्याला सुंदर आणि गुणवान आपत्याची प्राप्ती होते.

माघे मासि सिताष्टम्यां सतिलं भीष्मतर्पणम्।
श्राद्धं च ये नरा: कुर्युस्ते स्यु: सन्ततिभागिन:।।
(हेमाद्रि)

महाभारतानुसार जो मनुष्य माघ शुक्ल अष्टमीला तर्पण, जलदान करतो त्याचे वर्षभरातील पाप नष्ट होतात.

शुक्लाष्टम्यां तु माघस्य दद्याद् भीष्माय यो जलम्।
संवत्सरकृतं पापं तत्क्षणादेव नश्यति।।

व्रत विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....