आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराचे सौंदर्य वाढवण्‍यासाठी करा जुन्या जिन्सचा वापर, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळाच्‍या ओघात फॅशन बदलली. बदलत्‍या फॅशनमुळे पोशाखही बदलला. जिन्स पॅंट हा आजच्या तरुणाईचा सगळ्यात आवडता पोशाख आहे. एवढेच नाही तर अबालवृद्ध देखील मोठ्या जिन्स परिधान करताना दिसतात. प्रत्येकाकडे किमान चार ते पाच जिन्स असतात. परंतु, बाजारात उपलब्ध झालेल्या जिन्स पॅंटकडे आपण चटकण आकर्षित होत असतो. तरुणच काय तर तरुणीही मोठ्याप्रमाणात जिन्स खरेदी करताना दिसतात.
‍फॅशनच्या युगात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आज खरेदी केलेली जिन्स हे उद्या जूनी होते. त्यामुळे आपल्या घरातील कपाटात जून्या जिन्स तशाच पडून राहतात. त्यामुळे जून्या जिन्सचाही आपण रचनात्मक प‍द्धतीनेही करू शकतो. घराच्या सजावटीसाठी जून्या जिन्सचा वापर करू शकतात.

आज आम्ही आपल्यासाठी काही छायाचित्रे घेऊन आलो आहोत. ते पाहून आपण जुन्या जिन्स रचनात्मक पद्धतीने वापर करू शकतात. घरात सगळ्या वस्तू व्यवस्थित रचलेल्या दिसतात. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरातील सदस्यांच्या मूड प्रसन्न राहतो.
जिन्सचा वापर घर सजवण्यात कशा पद्धतीने करण्यात आला आहे, हे पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा..