आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेथे होतो पाण्याचा दुरुपयोग, तेथे थांबत नाही धनाची देवी लक्ष्मी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जीवनामध्ये पाण्याचे खूप महत्त्व असून पाण्याशिवाय जीवन जगणे शक्य नाही. धर्मग्रंथामध्ये पाण्याशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या घरामध्ये पाण्याचा दुरुपयोग होतो, त्याठिकाणी धनाचा अभाव राहतो आणि धनाची देवी लक्ष्मी त्या घरामध्ये निवास करत नाही. हीच गोष्ट वास्तुशास्त्रात सांगण्यात आली आहे. येथे जाणून घ्या पाण्याचा कसा दुरुपयोग किंवा पाणी दुषित केल्यास लक्ष्मी रुष्ट होते...

1 - वास्तूशास्त्रानुसार ज्या घरातील नळातून व्यर्थ पाणी टपकते, त्या घरामध्ये नेहमी धनाचा अभाव राहतो. नळातून व्यर्थ टपकणार्‍या पाण्याच्या आवाजामुळे घरातील आभामंडल प्रभावित होते. यामुळे नळातून पाणी टपकणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

2 - स्कंदपुराणानुसार....
मलं मूत्रं पुरीषं च शेषमं निष्ठीनाश्रु च।
गण्डूषाश्चैव मुञ्चन्ति ये ते ब्रह्ममहणै: समा:।।

अर्थ - जो मनुष्य नदी, तलाव किवा विहिरीतील पाण्यामध्ये मलमूत्र, थुक, गुळणा करतो किंवा त्यामध्ये कचरा टाकतो त्याला ब्रह्महत्यचे पाप लागते. असे लोक कधीही सुख-समृद्धी प्राप्त करू शकत नाहीत.

कोणत्या कामामध्ये पाण्याचा दुरुपयोग करू नये, हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा..