संपूर्ण श्रावण महिना महादेवाच्या उपासनेसाठी उत्तम मानला जातो. परंतु तरीही काही विशेष तिथींना खास विधीने महादेवाचे पूजन केल्यास साधकाला तत्काळ त्या उपासनेचे फळ प्राप्त होते. असे धर्म शास्त्रामध्ये वर्णीत आहे.
श्रावण शुद्ध षष्टी तिथी ( 2 ऑगस्ट, शनिवार) चे स्वामी भगवान शिव आहेत. या दिवशी शंकराला रुद्राभिषेक केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या तिथीला लाल वस्त्र आणि लाल वस्तूंचे दान केल्यास साधकाला सर्व सुख-सुविधा, ऐश्वर्याची प्राप्ती होते.