हे आहेत मृत्यूचे / हे आहेत मृत्यूचे स्वप्न : रामायणातही लिहिण्यात आले आहे या स्वप्नांचे रहस्य

धर्म डेस्क

Apr 22,2014 11:09:00 AM IST

मृत्यू हे एक असे सत्य ज्याविषयी सर्वांना माहिती आहे, परंतु तरीही लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. हिंदू धर्म ग्रंथामध्ये असे अनेक संकेत सांगण्यात आले आहेत ज्यावरून सहज समजू शकते की, कोणाचा मृत्यू केव्हा होणार. स्वप्न हे एक असे माध्यम आहे, ज्यामुळे आपल्याला मृत्यूपुर्वीचे संकेत मिळतात.

स्वप्न केवळ शुभ-अशुभ घटनांची माहिती देत नाहीत तर मृत्यूची भविष्यवाणीही करतात. वाल्मिकी रामायणामध्ये अशाच काही स्वप्नांचे वर्णन करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला रामायणात लिहिलेल्या स्वप्नांचे प्रसंग तसेच मृत्यूशी संबंधित स्वप्नांची माहिती सांगत आहोत.

वाल्मिकी रामायणानुसार राजा दशरथाचा मृत्यू झाला, त्या रात्री भरताने स्वप्नामध्ये त्याचे वडील दशरथ राजाला शेणाच्या कुंडात पोहताना पाहिले. काळ्या लोखंडाच्या चौकटीवर दशरथ राजा बसलेले होते. त्यांनी काळे वस्त्र परिधान केले होते आणि काळ्या रंगाच्या स्त्रिया त्यांच्यावर प्रहार करीत आहेत. भरताने स्वप्नात हे देखील पहिले की, राजा दशरथ लाल रंगाचा हार गळ्यात घालून आणि लाल चंदनाच्या गाढव जुंपलेल्या रथामध्ये बसून दक्षिण (यमाची दिशा) दिशेकडे जात आहेत.राम-रावणाच्या युद्धापूर्वी त्रिजटा नावाच्या राक्षसालाही रावणाच्या मृत्यूसंबंधी स्वप्न पडले होते, जे तिने सीतेला सांगितले होते. तिने सीतेला सांगितले की, लवकरच राक्षसांचा विनाश होणार आहे आणि तुझे स्वामी तुला रावणाच्या बंधनातून मुक्त करणार आहेत.जर स्वप्नामध्ये स्वतःला यात्रेवर निघताना पहिले तर यात्रा टाळावी, कारण यात्रेमध्ये तुमचा मृत्यू होऊ शकतो. स्वप्नामध्ये शरीराचा एखादा अवयव तुटलेला दिसला तर निकट भविष्यात एखाद्या कुटुंब सदस्याचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.ज्या व्यक्तीला वारंवार वाईट, भीतीदायक स्वप्न पडतात, त्याचे प्राण एक वर्षात यमदेव हरण करतात. स्वप्नामध्ये जो स्वतःच्या शरीरावर शाई किंवा तेल लावलेल्या आणि गाढवावर बसलेल्या स्वरुपात पाहतो, त्याचा मृत्यू एक वर्षाच्या आत निश्चितच होतो.जो व्यक्ती स्वप्नामध्ये स्वतःला नाचताना, हसताना पाहतो, त्याची हत्या होते. जो व्यक्ती स्वप्नात कावळा पाहतो त्याला पुढील काही दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समजते.जर एखाद्या लाल साडी परिधान केलेल्या स्त्रीने आलिंगन दिले किंवा सुकलेल्या फुलांचा हार घातला तर त्या व्यक्तीचा मृत्यू लवकर होतो. जो व्यक्ती स्वप्नामध्ये स्त्रीचे स्तनपान करतो, त्याचा मृत्यू निश्चित आहे.जर स्वप्नामध्ये एखाद्या लांब नख, पिवळे डोळे, निर्वस्त्र असलेल्या स्त्रीने आलिंगन दिले तर लवकरच मृत्यू निश्चित आहे. स्वप्नामध्ये स्वतःला झाडावरून पडताना पाहिले तर तो व्यक्ती एखाद्या आजाराने मृत्यू पावतो.जो स्वप्नामध्ये व्यक्ती स्वतःला स्मशानात अथवा पर्वताच्या शिखरावर बसून मद्यप्राशन करताना पाहतो, तो लवकरच मृत्यूला प्राप्त होतो.जर एखाद्या स्त्रीला स्वप्नामध्ये स्वतःचे केस पांढरे दिसले, तर पतीपासून ती विभक्त होते किंवा पतीचा मृत्यू होतो.जर एखादा व्यक्तीने स्वप्नामध्ये स्वतःला काळे कपडे घातेलेले, काळ्या घोड्यावर बसून सवारी करताना पाहिले तर एखाद्या रोगामुळे त्याचा मृत्यू होतो.जो व्यक्ती स्वप्नामध्ये आपल्या कुलदैवतेची प्रतिमा फुटताना किंवा जळताना पाहतो, त्या व्यक्तीचा काही दिवसांमध्ये मृत्यू होतो.
X