आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारी हे 5 उपाय केल्यास दूर होऊ शकतात गुरुचे दोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीत गुरु ग्रहा (बृहस्पती)शी संबंधित दोष असेल तर गृरुवारी विशेष पूजा करून या दोषाची शांती केली जाऊ शकते. बृहस्पती देवतांचे गुरूसुद्धा आहेत. गुरु वैवाहिक जीवन आणि भाग्य कारक ग्रह आहे. येथे जाणून घ्या, बृहस्पती ग्रहाच्या पूजेचे 5 सोपे उपाय...

1. गुरुवारी गुरु ग्रहानिमित्त व्रत ठेवा. या व्रतामध्ये पिवळे वस्त्र परिधान करावेत तसेच मीठ न टाकलेला आहार घ्यावा. जेवणात पिवळ्या रंगाचे पदार्थ उदा. बेसनाचे लाडू, आंबा, केळीचा समावेश करावा.
2. गुरु बृहस्पतीची मूर्ती किंवा प्रतिमा पिवळ्या कपड्यावर विराजित करावी. त्यानंतर पंचोपचार पूजा करावी. पूजेमध्ये केशर, चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फुल अर्पण करावे. पूजा झाल्यानंतर आरती करावी.
3. गुरु मंत्राचा जप करावा. मंत्र : ॐ बृं बृहस्पते नम: मंत्र जपाची संख्या कमीतकमी 108 असावी.
4. गुरूशी संबंधित पिवळ्या वस्तू दान कराव्यात. पिवळ्या वस्तू उदा. सोने, हळद, हरभऱ्याची डाळ, आंबा (फळ) इ.
5. महादेवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.
या उपायांनी धन, संपत्ती, विवाह आणि भाग्य बाधा दूर होऊ शकतात.