आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Navratri Friday Special Measure For Goddess Lakshmi In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्री विशेष : हे उपाय केल्यास तुम्हालाही प्राप्त होऊ शकते लक्ष्मी कृपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मग्रंथांमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी जवढे उपाय सांगण्यात आले आहेत तर सर्व उपाय तेव्हाच साध्य होतात, जेव्हा तुम्ही स्वतःला पवित्र आणि घराला स्वच्छ ठेवाल. स्वच्छता लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात अचूक उपाय आहे. लक्ष्मी ज्या तीन गोष्टींकडे सर्वात जास्त आकर्षित होते त्या स्वच्छता, सजावट आणि प्रकाश या आहेत. सजावटीचे महत्त्व तेव्हाच दिसते जेव्हा तुम्ही स्वच्छता ठेवता. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लक्ष्मीला आकर्षित करते, ती म्हणजे प्रकाश. दुधाळ, शुभ्र प्रकाशाने उजळ झालेल्या घराला लक्ष्मी स्वतः शोधते. या तीन गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन तुम्ही कोणताही लक्ष्मी प्राप्तीचा उपाय केल्यास लवकर फळ प्राप्त होईल. शास्त्रामध्ये काही विशेष उपायांचे वर्णन करण्यात आले आहे. हे उपाय केल्यास देवी लक्ष्मी सदैव तुमच्या घरात निवास करेल.

जलपर्णीने तुमच्या घरात येईल सुख-समृद्धी
घरामध्ये सुख-समृद्धीसाठी गुरुवारी थोडीशी जलपर्णी आणून पिवळ्या कपड्यात बांधून स्वयंपाकघरात लटकावून ठेवा. जोपर्यंत ही घरात आहे तोपर्यंत सुख-समृद्धी राहील. जीवनात महालक्ष्मीची कृपा सदैव राहण्यासाठी प्रत्येक गुरुवारी जलपर्णी बदलत राहा. जुनी जलपर्णी एखाद्या विहीर, नदी किंवा तलावामध्ये विसर्जित करा. एखाद्या कारणामुळे गुरुवारी जलपर्णी बदलणे शक्य झाले नाही तर पुढील गुरुवारी बदला. कोणत्याही नदी, तलावामध्ये जलपर्णी सहजपणे उपलब्ध होते.

पुढे जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)