आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, या रुद्राक्षाचे खास फायदे; दूर होतील सर्व विघ्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या शंकराचा पुत्र श्रीगणेशाच्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. या दहा दिवसांमध्ये श्रीगणेशाची उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामधील एका उपाय म्हणजे गणेश रुद्राक्ष धारण करणे. रुद्राक्षांचे बरेच प्रकार आहेत. त्यामध्येच एक आहे गणेश रुद्राक्ष. गणेश रुद्राक्षाला गणपतीचे स्वरूप मानले गले आहे.

रुद्राक्षाची निर्मिती शंकराच्या नेत्रातून झाली अशी कथा आहे. त्रिपुरासूर वधावेळी शंकर अनिमिष दृष्टी लावून बसलेले होते. तेव्हा त्यांच्या सूर्यनेत्रातून 12 प्रकारचे, चंद्रनेत्रातून 16 प्रकारचे आणि अग्निनेत्रातून 10 प्रकारचे रुद्राक्ष उत्पन्न झाले. यावरून एकूण 38 प्रकारचे रुद्राक्ष असतात. अश्रूत मोठी शक्ती असते. अश्रूचे आनंदाश्रू, दु:खाश्रू आणि योगाश्रू असे तीन प्रकार आहेत. शंकराचे अश्रू हे योगाश्रू होते. ज्याने आनंद दिला त्याचे भले करण्याची शक्ती आनंदार्शूत असते. त्याप्रमाणे दुष्टांचे पारिपत्य करण्याची आणि सृष्टीचे रक्षण करण्याची शक्ती योगार्शूत असते. जो रुद्राक्ष धारण करतो त्याच्या ठिकाणी ही शक्ती उत्पन्न होते. त्याच्या मनातील दृष्टवृत्तींचा नाश होऊन सुष्टवृत्तींचा प्रकर्ष होतो. ‘सर्वे सुखिन: भवन्तु’ अशी शिवदृष्टी त्याला लाभते.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, गणेश रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे...