आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरामध्ये दिवा लावण्याच्या या उपायाने प्रसन्न होते लक्ष्मी, दूर होऊ शकते तंगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार देवी लक्ष्मीला धनाची देवी मानण्यात आले आहे. असे मानले जाते की, सृष्टीचे पालनहार भगवान विष्णूची पत्नी जेथे निवास करते त्या घरात दरिद्रता राहत नाही. यामुळे देवी लक्ष्मीची ऐश्वर्य देवी स्वरुपात पूजा केली जाते. संध्याकाळी देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमण करण्यासाठी निघते. यामुळे या काळामध्ये घरामध्ये दिवा लावणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या वेळेला घरात दिवा लावलेला असल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरामध्ये निवास करू लागते. तुम्हालाही देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असेल तर येथे जाणून घ्या, लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे सोपे उपाय...

- दररोज संध्याकाळी देवघरात किंवा पवित्र ठिकाणी अक्षता ठेवून देवी लक्ष्मीचे स्मरण करून खालील मंत्राचा उच्चार करीत दोन दिवे लावावे..

दीपो ज्योति: परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:।
दीपो हरतु मे पापं सांध्यदीप नमोस्तुते।।
शुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखसम्पदम्।
शत्रुबुद्धिविनाशाय च दीपज्योतिर्नमोस्तु ते।।

धर्म ग्रंथानुसार दररोज या मंत्राचा उच्चार करून दिवा लावल्यास घरामध्ये आर्थिक अडचण निर्माण होत नाही. तसेच जीवनातील सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे आणखी काही खास उपाय....