हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की, धनेन बलवांल्लोके धनाद्भवति पण्डित:| सोप्या शब्दात अर्थ असा आहे की, धनामुळे व्यक्ती ताकदवान बनतो म्हणजेच व्यक्तीची गणना गुणी, विद्वान आणि योग्य लोकांमध्ये केली जाते. याच कारणामुळे व्यक्ती जीवनात सुख आणि पैसा प्राप्त करण्याची इच्छा बाळगतो. तुम्हालाही सुखी जीवन जगण्याची इच्छा असेल तर विशेषतः 25 सप्टेंबर गुरुवारपासून सुरु होत असलेल्या शारदीय नवरात्रीमध्ये येथे सांगण्यात आलेल्या उपायानुसार लक्ष्मीची उपासना करा.
- सकाळी झोपेतून उठल्याबरोबर तळहातांचे दर्शन घ्यावे. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे हातावरील पुढील भागामध्ये लक्ष्मीचा वास असतो.
- एखाद्या पवित्र जलाशयावर जाऊन अर्घ्य द्यावे. पवित्रतेमध्ये लक्ष्मीचा वास मानण्यात आला आहे. यामुळे पवित्र ठिकाणी गेल्यास लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते.
- नवरात्रीमध्ये दररोज देवी लक्ष्मीची पंचोपचार पूजा गंध, फुल, धूप, दीप व नैवेद्य दाखवून करावी आणि लक्ष्मीची आरती करून शेवटी विशेषतः शंख किंवा डमरू वाजवावा. असे केल्याने घरातील दरिद्रता, कलह, दोष दूर होतात असे मानले जाते.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे आणखी काही सोपे आणि प्रभावी उपाय....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)