ज्योतिष आणि तंत्र शास्त्रामध्ये अनेक चमत्कारी उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यांनतर ईश्वराची कृपा प्राप्त होते. याच उपयामधील एक खास उपाय केल्यास हनुमान स्वप्नामध्ये भक्ताला दर्शन देऊन सर्व इच्छापुर्तींचा आशीर्वाद देतात. हे अनुष्ठान 81 दिवसांचे आहे. हा उपाय गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित हनुमान अंकात सांगण्यात आला आहे. हा उपाय हनुमान अष्टमी (14 डिसेंबर, रविवारी) किंवा एखाद्या मंगळवारपासून सुरु केल्यास विशेष फळ प्राप्त होते.
या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या...
हा उपाय करताना ब्रह्मचर्य पालन अत्यावश्यक आहे. तसेच क्षौर कर्म म्हणजे नख, केस कापणे, दाढी करणे ही कामे करू नयेत. मद्यप्राशन आणि मांसाहार या काळामध्ये चुकूनही करू नये.
उपाय-
हनुमान अष्टमी किंवा महिन्यातील कोणत्याही मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ कपडे परिधान करून हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाच्या मूर्तीला जलाभिषेक करावा. पहिल्या दिवशी अखंड उडदाचा एक दाणा हनुमानाच्या डोक्यावर ठेऊन अकरा प्रदक्षिणा घालाव्यात.
आपल्या मनातील इच्छा हनुमानासमोर व्यक्त करावी. त्यानंतर हुनमानाच्या डोक्यावर ठेवलेला उडदाचा दाणा सोबत घ्यावा. दुसऱ्या दिवसापासून एक-एक उडदाचा दाणा दररोज वाढवत राहा आणि ही प्रक्रिया अशीच चालू ठेवा.
41 दिवस हा प्रकार केल्यानंतर 42 व्या दिवसपासून एक एक उडीद कमी करावा. असे केल्यानंतर 81 व्या दिवशी एक उडीद शिल्लक राहिल. म्हणजेच 42 व्या दिवशी 40, 40 व्या दिवशी 39 आणि 81व्या दिवशी 1 दाणा. 81 व्या दिवशी हनुमान तुमच्या स्वप्नात येतील व तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद देतील. या पूजेसाठी वापरलेले उडीद अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर नदी किंवा विहिरीत प्रवाहित करा.
हनुमान अष्टमीनिमित्त इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...