आज (2 जून) मंगळवार आणि पौर्णिमेचा शुभ योग जुळून येत आहे. धर्म ग्रंथानुसार मंगळवार आणि ही तिथी दोन्ही हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांसाठी विशेष मानली गेली आहे. उद्या मंगळवार आणि पौर्णिमा तिथीचा शुभ योग तुमचे अपूर्ण काम पूर्ण करू शकतो. या दिवशी विधिव्रत हनुमानाची पूजा केल्यास ते लवकर प्रसन्न होऊ शकतात. येथे जाणून घ्या, हनुमानाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...
1. मंगळवारी हनुमानाला शेंदूर आणि लाल वस्त्र अर्पण केले जाते. हनुमानाला वस्त्र अर्पण करण्यापूर्वी स्वतः स्नान करून शुद्ध व्हावे. त्यानंतर लाल रंगाचे धोतर परिधान करावे. वस्त्र अर्पण करण्यासाठी चमेलीच्या तेलाचा उपयोग करावा. हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा एक दिवा लावून ठेवावा. लाल वस्त्र अर्पण केल्यानंतर हनुमानाला गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करून केवड्याचे अत्तर लावावे. त्यानंतर गुळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर त्याच ठिकाणी बसून तुळशीच्या माळेने खालील मंत्राचा कमीत कमी पाच माळ जप करावा.
मंत्र -
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्त्र नाम तत्तुन्यं राम नाम वरानने।।
जप झाल्यानंतर हनुमानाला अर्पण केलेल्या गुलाबाच्या हारातील एक फुल तोडून लाल कपड्यात बांधून धन स्थानावर ठेवा. या उपायाने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
पुढे जाणून घ्या, बजरंगबलीला प्रसन्न करण्याचे इतर उपाय...