आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील या 10 ठिकाणांवर जाण्यापूर्वी हे अवश्य वाचा, शापित मानले जातात हे ठिकाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाची माहिती सांगत आहोत, जेथे मृत्युच्या छायेत अडकून आकशाला गवसणी घालणारे पक्षी स्वतः मृत्यूला कवटाळतात म्हणजेच आत्महत्या करतात. तुम्हाला हे वाचून थोडेसे विचित्र वाटले असेल की, पक्षी आत्महत्या कशी काय करू शकतात. परंतु ही गोष्ट केवळ तुम्हालाच चकित करणारी नसून येथे राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक गूढ बनली आहे.

ही घटना विदेशात घडत असल्याचा विचार तुम्ही करत असाल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. हे सर्वकाही भारतात घडते. भारताचे उत्तर पूर्व राज्य आसाममध्ये एक घाटी आहे. या घाटीला जट‌िंगा व्हॅली म्हणतात. येथे गेल्यानंतर तुम्हाला पक्षी आत्महत्या करणारे दृश्य दिसेल. मान्सून काळात ही घटना जास्त प्रमाणात घडते. या व्यतिरिक्त अमावास्येच्या रात्री पक्षी आत्महत्या करण्याच्या घटना जास्त पाहावयास मिळतात. येथील स्थानिक हे काम भूतप्रेत आणि अदृश शक्तींचे असल्याचे मानतात.

याउलट वैज्ञानिक दृष्टीकोनातून धारणा अशी आहे की, जोराच्या हवेमुळे पक्षांचे संतुलन बिघडते आणि ते जवळपासच्या झाडांना धडकून जखमी होतात किंवा मरतात. या घटनेमागे सत्य काहीही असले तरी, हे ठिकाण पक्षांच्या आत्महत्येसाठी जगभरात एक रहस्य बनले आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भारतातील इतर 10 शापित ठिकाणांची खास माहिती, येथे रात्री जाणे धोक्यापेक्षा कमी नाही...
बातम्या आणखी आहेत...