आपल्या समाजात दृष्ट लागण्याची मान्यता फार जुनी आहे. असे मानले जाते की, दृष्ट लागल्यानंतर व्यक्तीमध्ये विविध बदल दिसून येतात. उदा, एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मुल रडू लागते, त्याचे शरीर तापाने फणफणते, चिडचिड करणे इ गोष्टी दिसून येतात.
येथे जाणून घ्या, का लागते दृष्ट (नजर).
मोठ्या लोकांच्या तुलनेत लहान मुलांना दृष्ट लागण्याचे प्रमाण जास्त असते कारण मुलांचे शरीर कोमल असते तसेच त्यांच्या शरीरात विद्युतीय क्षमता मोठ्यांच्या तुलनेत कमी असते. जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर त्याच्या दृष्टीची उर्जा मुलांच्या उर्जेला प्रभावित करते. यामुळे मुल आजारी पडू शकते. वाईट दृष्टीपासून मुलांचे रक्षण करण्यासाठी काळा ठिपका लावला जातो किंवा काळा दोरा बांधला जातो.
यामागे वैज्ञानिक कारण आहे. काळा रंग उष्णतेचे अवशोषक आहे. यामुळे मुलांना काळा ठिपका लावल्यास किंवा काळा दोरा बांधला जातो. यामुळे कोणत्याही प्रकराची उर्जा (वाईट दृष्टी) लहान मुलांमध्ये प्रवेश करत नाही. यामुळे मुलांना दृष्ट लागत नाही.
पुढे जाणून घ्या, दृष्ट लागल्यास कोणते उपाय केले जाऊ शकतात....