आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मंत्राने वाढते आशीर्वाद देण्याची शक्ती आणि होतात हे लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
28 मे 2015 गुरुवारी गायत्री जयंती असून या दिवशी देवी गायत्रीची विशेष पूजा केली जाते. देवी गायत्रीच्या प्रसन्नतेसाठी गायत्री मंत्राचा जप सर्वश्रेष्ठ उपाय आहे. जो व्यक्ती या मंत्राचा दररोज विधिव्रत जप करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. गायत्री जयंतीच्या निमित्ताने येथे जाणून घ्या, या मंत्राच्या खास गोष्टी आणि उपाय...
शास्त्रानुसार गायत्री मंत्राला सर्व वेदांमध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र मानले गेले आहे. या मंत्राच्या जपासाठी तीन वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वात उत्तम वेळ पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताची व तिन्ही संध्यांची(सकाळी सूर्योदयाच्या वेळी, दुपारी १२ वाजेच्या दरम्यान व सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी) जप केल्यास खूप लाभ होतो.

गायत्री मंत्राचा जप शक्य असल्यास एखाद्या नदीजवळ, घरामध्ये एकांत असलेल्या ठिकाणी, वनामध्ये करणे लाभदायक मानले जाते. जप करताना मंत्राचा उच्चार स्पष्ट व शुद्ध असला पाहिजे. जेव्हा तुमचे मन खूप अशांत असेल तेव्हा जप करू नये. नियमाप्रमाणे ठरविलेल्या संख्येत जप पूर्ण करूनच उठावे. मग कितीही महत्वाचे काम असले तरी नियम मात्र अवश्य पूर्ण करा.
गायत्री मंत्र : ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।
अर्थ - त्या प्राणस्वरूप, दु:ख नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरआत्म्यात धारण करू. त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे.
या मंत्राचे लाभ -
- उत्साह व साकारात्मकता वाढते.
- परमार्थात रुची वाढते
- आशीर्वाद देण्याची शक्ती वाढते.
- नेत्रामध्ये तेज वाढते
- क्रोध शांत होतो.
- ज्ञानात वृद्धी होते.

पुढे जाणून घ्या, गायत्री मंत्राचे उपाय...
बातम्या आणखी आहेत...