आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणात बुधवार-चतुर्थीचा शुभ योग, या उपायांनी प्रसन्न होतील श्रीगणेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या श्रावण महिना सुरु आहे, जो महादेवाला अत्यंत प्रिय आहे. श्रावण महिन्यात आज (30 जुलै) बुधवार आणि चतुर्थीचा शुभ योग जुळून आला आहे. बुधवार आणि चतुर्थी हा वार आणि तिथी दोन्ही श्रीगणेशाला प्रिय आहे. अशाप्रकारे महादेवाच्या या महिन्यात त्यांचा मुलगा श्रीगणेशच्या आवडत्या वार आणि तिथीचा हा संयोग खूपच फलदायी आहे.

या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी व्रत व विशेष पूजन केले जाते. शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास श्रीगणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हालाही या संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर पुढे सांगण्यात आलेले उपाय विधीपूर्वक अवश्य करा.

1 - बुधवारी सकाळी स्नान केल्यानंतर घराजवळील गणपती मंदिरात जाऊन श्रीगणेशाला 21 गुळाच्या ढेपी आणि दुर्वा अर्पण करा. हा उपाय केल्याने श्रीगणेश भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. हा एक चमत्कारिक उपाय आहे.

2 - तुमच्या जीवनात खूप अडचणी असतील तर आज हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला आणि श्रीगणेशाच्या मंदिरात जाऊन अडचणींमधून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करावी. या उपायाने तुमच्या जीवनातील अडचणी काही दिवसांमध्ये दूर होतील.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आणखी काही खास उपाय..
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)