आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indira Ekadashi Worship Information In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज एकादशीसोबतच शुक्रवार आणि पुष्य योग, करू शकता हे सोपे 11 उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (19 सप्टेंबर) भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. धर्म ग्रंथांमध्ये या तिथीला इंदिरा एकादशी सांगण्यात आले आहे. या वर्षी इंदिरा एकादशीसोबतच शुक्रवार आणि पुष्य नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. धर्म ग्रंथामध्ये एकादशी तिथीचे स्वामी भगवान विष्णू तर शुक्रवारी महालक्ष्मीच्या पूजेचे विधान आहे.

शास्त्रामध्ये पुष्य नक्षत्राला अत्यंत शुभ मानण्यात आले आहे. या नक्षत्रामध्ये केला गेलेला कोणताही उपाय लवकर शुभफळ प्रदान करतो असे मानले जाते. अशाप्रकारे एकादशी, शुक्रवार आणि पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग खूपच विशेष आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, एकादशीचे खास उपाय...

1 - एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ऊं वासुदेवाय नम: या मंत्राचा उच्चार करीत 11 प्रदक्षिणा घालाव्यात. या उपायाने घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहील तसेच घरावर कोणतेही संकट येणार नाही.

2 - एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात. त्यानंतर विधीपूर्वक गायत्री मंत्राचा जप करावा. स्त्रियांसाठी हे स्नान त्यांच्या पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देणारे आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, एकादशीचे अन्य काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)