उज्जैन/इंदूर - नवरात्रीला चक्रतीर्थ स्मशानात कापालिक भैरावानंद यांनी चिता स्थळावर तंत्र क्रिया करून तीन भविष्यवाणी केल्या. यांच्यानुसार भारत-पाकमध्ये युद्ध होणार नाही.
वाचा, बाबाच्या इतर दोन भविष्यवाणी
- बाबाची दुसरी भविष्यवाणी उत्तर प्रदेश निवडणुकीत सत्ता परिवर्तन होणार आणि केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आहे तेच येथे राज्य करेल अशी आहे.
- तिसरी भविष्यवाणी अमेरिकेतील निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचा विजय होईल.
- स्मशानात जवळपास 3 तास चालेल्या या तंत्र पूजे दरम्यान बाबांचे मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.
सिहंस्थमध्ये केली होती स्मशान साधना...
- कापालिक बाबांनी उज्जैनमध्ये झालेल्या सिहंस्थसाठी चक्रतीर्थ स्मशानात आपल्या विदेशी शिष्येसोबत स्मशान साधना केली होती.
- मध्यरात्री जळत्या चितेसमोर बसून त्यांनी तंत्र साधना केली होती. या साधनेचा उद्देश्य सिंहस्थमध्ये जुळून आलेल्या चांडाळ योगामुळे घडणारे अनिष्ट टाळणे हा होता.
मिरचीने केले होते हवन
- सिंहस्थ यशस्वी होण्यासाठी एक क्विंटल मिरचीने हवन केल्यानंतर अमावास्येला रात्री चक्रतीर्थावर कापालिक, अघोरी, तांत्रिक आणि साधकांनी विशेष पूजा केली होती.
- येथे 50 पेक्षा जास्त तांत्रिक आणि साधकांनी 52 भैरव, स्मशान भैरव, चिता साधना, स्मशान किंकरी, भैरव साधना, महाकाली महाविद्याची साधना केली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, तंत्र साधनेचे फोटो....