( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
धर्म शास्त्रामध्ये पोर्णिमा तिथिला विशेष फलदायी मानण्यात आले आहे. इतर पोर्णिमांच्या तुलनेत माघी पोर्णिमेचे महत्व अधिक आहे. पुराणानुसार आजच्या दिवशी करण्यात आलेले विशेष उपाय धनाची देवी लक्ष्मी शीघ्र प्रसन्न होण्यास मदत होते. ज्योतिष शास्त्रानुसार यावेळेसची माघी पोर्णिमा आणि पुष्य नक्षत्राचा शुभ योग 3 फेब्रुवारी, मंगळवारी आहे. या शुभ योगावर तुम्ही येथे सांगितलेले उपाय करू शकता याचा फायदा तुम्हाला नक्की होईल -
1- आज रात्री 12 नंतर महालक्ष्मी आणि विष्णुची पुजा करावी. तसेच घराच्या मुख्य दरवाज्यापाशी गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होण्यास मदत होते.
2- आजच्या दिवशी सकाळी विधिवत पद्धतीने सरस्वतीची देखील पुजा केली जाते. विद्या, बुद्धिची देवी समजल्या जाण्या-या देवीची पुजा केल्याने ती विशेष प्रसन्न होण्यास मदत होते.
3- पितरांच्या तर्पणासाठी देखील आजचा दिवस उत्तम मानण्यात आला आहे. या दिवशी पित्रांना जलदान, अन्नदान, भूमिदान, वस्त्र तसेच भोजन पदार्थ दान करण्याने पित्र तृप्त होतात.
माघी पोर्णिमेचे इतर उपाय जाणून्म घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...