आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 उपाय, यामुळे कमी होऊ शकतो केतूचा अशुभ प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये केतूला पाप ग्रह मानण्यात आले आहे. याच्या प्रभावाने व्यक्तीला जीवनात अनेक संकटाना सामोरे जावे लागते. येथे सांगण्यात आलेले काही सोपे उपाय करून केतूचा अशुभ प्रभाव कमी केला जाऊ शकतो.

1. दोन्ही पक्षातील त्रयोदशी तिथीला व्रत करावे.
2. भैरवाची उपासना करावी. केळीच्या पानावर भाताचा नैवेद्य दाखवावा.
3. दररोज संध्याकाळी गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा तुळशीसमोर लावावा.
4. हिरव्या रंगाचा रुमाल नेहमी जवळ ठेवावा.
5. तिळाचे लाडू सौभाग्यवती स्त्रीला द्यावेत तसेच तिळाचे दान करावे.
6. कुमारिकांना रविवारी गोड दही आणि हलवा खाऊ घालावा.
7. बर्फीचे चार तुकडे वाहत्या पाण्यात प्रवाहित करावेत.
8. कृष्ण पक्षात दररोज संध्याकाळी एक द्रोणामध्ये भात घेऊन त्यावर दही आणि काळे तीळ टाकून दान करावा. दान करणे शक्य नसेल तर द्रोण पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा.