जर तुमच्या कुंडलीत शनि किंवा राहू-केतूमुळे दोष असेल तर येथे काही खास उपायांची माहिती देत आहोत. हे उपाय उडदाच्या डाळीने करावेत. शनीचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहतो. ज्योतिष शास्त्रानुसार शनीला न्यायाधीशाचे पद प्राप्त आहे. वर्तमानात सध्या तीन राशी( कन्या, तूळ आणि वृश्चिक)ला शनीची साडेसाती आणि दोन राशी कर्क आणि मीनला अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव) सुरु आहे. अशाप्रकारे या पाच राशींवर शनीचा सर्वात जास्त प्रभाव राहील. तुम्हालाही शनि कृपेने आर्थिक अडचणी दूर करण्याची इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहा...
- कोणत्याही शनिवारी संध्याकाळी अखंड उडदावर थोडेसे दही आणि शेंदूर लावून हे उडीद एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या. परत येताना मागे वळून पाहू नका. हा उपाय शनिवारपासून सुरु करावा. प्रत्येक शनिवारी हा उपाय केल्यास भविष्यात निश्चितच लाभ होईल.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)