आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Astrological Measures Of The Roots Of Tree

या झाडांच्या मुळांपासून होऊ शकतो भाग्योदय, जाणून घ्या प्राचीन उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या युगात अनेक लोक ज्योतिष विद्येलाही एकप्रकारचे विज्ञान मानतात. या विद्येपासून भूत, भविष्य आणि वर्तमानाची माहिती मिळते. तसेच आयुष्याला सुखी आणि समृद्धीशाली करण्याचे उपाय केले जाऊ शकतात. कुंडलीतील 12 स्थानांमध्ये ग्रहांच्या चांगल्या-वाईट स्थितीनुसार आपले आयुष्य चालते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर त्या व्यक्तीचा भाग्योदय होत नाही. येथे जाणून घ्या, झाडांच्या मुळांचे उपाय ज्यामुळे ग्रहदोष दूर होतात आणि व्यक्तीचा भायोदय होऊ शकतो....

अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाय करण्यात येतात. ग्रहांचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी ग्रहाशी संबंधित रत्न, मोती धारण करणे हा एक उपाय आहे. खरे रत्न, मोती खूप महाग असतात. प्रत्येक व्यक्ती हे रत्न खरेदी करू शकत नाहीत. याच कारणामुळे अनेक लोक रत्न धारण करत नाहीत, ज्योतिष शास्त्रानुसार रत्नांमुळे प्राप्त होणारे शुभ प्रभाव वेगवेगळ्या ग्रहांशी संबंधित झाडाचे मूळ धारण करूनही प्राप्त केले जाऊ शकतात.

सर्व ग्रहांचा वेगवेगळ्या झाडांशी सरळ संबंध असतो. यामुळे या झाडांचे मूळ धारण केल्यास अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ शकतो. आर्थिक अडचणी दूर होतात. येथे सांगण्यात आलेय झाडांची मुळं कोणत्याही पूजन साहित्याच्या दुकानात सहजपणे उपलब्ध होतात.

- जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यदेवाचा अशुभ प्रभाव असेल तर माणिक रत्न धारण केले जाते. माणिक रत्न खरेदी करणे शक्य नसेल तर बेलाच्या झाडाचे मुळ लाल किंवा गुलाबी धाग्यात रविवारी धारण करावे. या उपायाने सूर्यदेवाचे शुभफळ प्राप्त केले जाऊ शकतात.

- पुढे जाणून घ्या, इतर ग्रहांसाठी कोणकोणत्या झाडाचा मुळांचा उपयोग करावा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)