आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार+अमावस्या योग : आज रात्री करू शकता हे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज मंगळवार आणि अमावस्या योग आहे. पंचांगानुसार 20 जानेवारी 2015 रोजी मंगळवारी पौष मासातील अमावस्या तिथी आहे. या तिथीला मौनी अमावस्या म्हणतात. शास्त्रामध्ये अमावस्येला पूजन कर्मासाठी श्रेष्ठ तिथी सांगण्यात आले आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांनी अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच अडचणींमधून मुक्ती मिळते. अमावास्येच्या रात्री चंद्र दर्शन होत नाही, यामुळे रात्री अंधार जास्त असतो. या दिवशी रात्री पूजन केल्यास विशेष फळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, अमावास्येच्या रात्री करण्यात येणारे काही खास उपाय...
हनुमान उपासनेचा दिवस आहे मंगळवार -
प्राचीन काळापासून चालत आलेल्या मान्यतेनुसार मंगळवारी हनुमानाची विशेष पूजा-अर्चना केली जाते. धर्म ग्रंथानुसार मंगळवारी हनुमानाचा जन्म झाला आहे. याच कारणामुळे या दिवशी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. अमावास्येच्या रात्री हनुमान चालीसाचे पाठ करावेत. या उपायाने सर्व बाधा दूर होतात. हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

पुढे जाणून घ्या, मंगळवार आणि अमावस्या योगामध्ये करण्यात येणारे काही खास उपाय...