आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानासमोर करा काळ्या उडदाचा हा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शनिवारी १२ जुलैला हिंदू पंचांगानुसार गुरु पौर्णिमा आहे. ही तिथी वेद व्यास यांची जन्म तिथी आहे. शनिवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. जर एखादा व्यक्ती अडचणीत असेल तर त्याने या दिवशी हनुमानासमोर उडदाच्या डाळीचा हा एक उपाय करावा.

शनिदेवाच दिवस आहे शनिवार
शास्त्रामध्ये शनिवारला विशेष महत्त्व देण्यात आले आहे, कारण या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याचे विधान आहे. शनिदेवाला न्यायाधीशाचे पद प्राप्त आहे. हाच ग्रह आपल्या कर्मानुसार शुभ-अशुभ फळ प्रदान करतो. शनिदेवाला प्रसन्न करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत परंतु या उपायांमधील सर्वात प्रभावशाली उपाय हनुमानाशी संबंधित आहेत.

हनुमानाच्या पूजेने शनिदोष का होतो दूर..
शास्त्रानुसार रामायण काळात शनीला आपल्या ताकद आणि पराक्रमाचा खूप गर्व झाला होता. त्याच काळामध्ये हनुमानाच्या सामर्थ्याची कीर्ती दाही दिशांना पसरली होती. जेव्हा शनिदेवाला हनुमानाची कीर्ती समजली, तेव्हा ते हनुमानासोबत युद्ध करण्यासाठी निघाले. एका ठिकाणी हनुमान श्रीरामाच्या भक्तीमध्ये लीन होऊन बसले होते, त्या ठिकाणी शनिदेव पोहचले आणि हनुमानाला युद्धासाठी सज्ज होण्यास सांगितले.

बजरंगबलीने शनिदेवाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु शनिदेव काहीही ऐकण्यास तयार नव्हते. त्यानंतर या दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले आणि युद्धामध्ये शनिदेव पराभूत झाले. युद्धामध्ये हनुमानाने केलेल्या प्रहारामुळे शनिदेवाच्या शरीराला असह्य वेदना होऊ लागल्या. या वेदना शांत करण्यासाठी हनुमानाने त्यांना तेल दिले. तेल लावताच शनिदेवाच्या सर्व वेदना शांत झाल्या. तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण करण्याची प्रथा सुरु झाली. शनिदेवाला जो व्यक्ती तेल अर्पण करतो, त्याच्या जीवनातील सर्व अडचणी समाप्त होतात आणि पैशांची तंगी दूर होते. हनुमानाच्या कृपेने शनिदेवाची पिडा दूर झाली, याच कारणामुळे आजही हनुमानाच्या भक्तांवर शनीची विशेष कृपा राहते.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, एक छोटासा चमत्कारी उपाय ज्यामुळे तुम्हाला शनिदेव आणि हनुमानाची कृपा प्राप्त करू शकता....

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)