आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज अवश्य करा हनुमानाच्या या पाच उपायांमधील कोणताही एक उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनि एक क्रूर ग्रह असून यांना न्यायाधीशाचे पद प्राप्त आहे. शनि एकमेव असा ग्रह आहे, जो कुंडलीतील इतर ग्रहांच्या शुभ प्रभावाला प्रभावित करू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाला भलेही क्रूर ग्रह मानले जात असेल परंतु शनिदेव शुभफळसुद्धा प्रदान करतात. शनि सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. शनि एकमात्र असा ग्रह आहे, जो अडीच वर्ष एका राशीत राहतो. याच कारणामुळे यांना शनैश्चर म्हटले जाते.

हनुमानाच्या भक्तांना त्रास देत नाहीत शनिदेव, जाणून घ्या, असं का....
शनिदेवाला तेल अर्पण केले जाते. या संदर्भात एक कथा प्रचलित आहे, त्यानुसार एकदा हनुमान आणि शनिदेवामध्ये युद्ध झाले. या युद्धामध्ये शनिदेवाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर शनिदेवाच्या शरीरावरील वेदना कमी करण्यासाठी हनुमानाने त्यांना तेल प्रदान केले. हे तेल लावल्यामुळे शनिदेवाच्या वेदना कमी झाल्या. तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण केले जाऊ लागले. हनुमानामुळे शनिदेवाच्या वेदनेचा अंत झाला आणि याच कारणामुळे शनिदेव हनुमानाच्या भक्तांवर वक्र दृष्टी टाकत नाहीत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हनुमानाचे पाच उपाय...