काही काळापूर्वी खिशात पाकीट ठेवणे एक स्टेटस सिम्बॉल मनाला जात होता. परंतु सध्याच्या काळात पाकीट जवळ ठेवणे आवश्यक झाले आहे. पाकीट ठेवण्याचे विविध फायदे आहेत, उदाहरणार्थ तुमचे पूर्ण पैसे पाकिटात व्यवस्थित ठेवू शकतात. तसेच पाकिटात महत्त्वाचे कागदपत्र, डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था असते. पाकीट जवळ असल्यास तुम्हाला पैसे किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी खिसे चाचपडावे लागत नाहीत.
शास्त्रानुसार पाकिटात काही खास गोष्टी ठेवल्यास यामुळे केवळ बरकतच वाढत नाही तर याचे शुभफळ प्राप्त होतात. पाकिटात अशाही काही वस्तू ठेवल्या जातात ज्यामुळे नकारत्मक उर्जा निर्माण होते आणि ज्यामुळे
आपल्याला नुकसान सहन करावे लागते. आज आम्ही तुम्हाला पाकिटात कोणत्या गोष्टी ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत यासंदर्भात विशेष माहिती सांगत आहोत.
देवी लक्ष्मीचा फोटो...
जर तुम्ही तुमच्या पाकिटात लक्ष्मीचा फोटो ठेवला तर याचे शुभफळ प्राप्त होतात. पाकिटात लक्ष्मीचा फोटो ठेवल्यास बरकत कायम राहते आणि पाकीट रिकामे होत नाही. परंतु लक्ष्मीचा खराब किंवा फाटलेला फोटो पाकिटात ठेवू नये. फाटलेला फोटो नदीमध्ये प्रवाहित करावा.
पाकिटात आणखी कोणकोणत्या वस्तू ठेवू शकतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...