आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मी आणि श्रीगणेशाचे प्राचीन उपाय, यामुळे दूर होऊ शकते गरिबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगणेश आणि महालक्ष्मीच्या पूजेने सर्व दुःख दूर होऊ शकतात. श्रीगणेशाच्या कृपेने रिद्धी-सिद्धीची प्राप्ती होते आणि महालक्ष्मीच्या कृपेने दरिद्रता नष्ट होते. येथे जाणून घ्या, या दोन्ही देवतांची एकत्र कृपा प्राप्त करण्याचा उपाय...
कोणत्याही शुभ मुहूर्तावर करू शकता हा उपाय -
ज्या मुहूर्तावर उपाय करावयाचा आहे, त्यादिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र होऊन पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. एखाद्या मंदिरात जावे किंवा घरीच श्रीगणेश आणि महालक्ष्मी पुजेची व्यवस्था करावी. पूजेची तयारी झाल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून आसनावर बसावे.
- दोन्ही देवी-देवतेच्या मूर्तींना पंचामृताने अभिषेक करावा.
- अभिषेक केल्यानंतर श्रीगणेशाला पिवळ्या रंगाचा तांदळावर विराजित करावे.
- देवी लक्ष्मीला लाल कुंकवाने रंगवलेल्या तांदळावर विराजित करावे.
- त्यानंतर श्रीगणेशाला चंदन आणि लाल फुल अर्पण करावे. देवी लक्ष्मीला कुंकू आणि लाल फुल अर्पण करावे.
- प्रसादासाठी गुळाचे लाडू आणि खीर तयार करावी.
- अशाप्रकारे पूजा केल्यानंतर धूप-दीप लावून, श्रीगणेश-महालक्ष्मीची आरती करावी.
- त्यानंतर पंचामृत आणि प्रसाद ग्रहण करावा. अशाप्रकारे वेळोवेळी हा उपाय करत राहावा.

या पुजेसोबातच श्रीगणेश आणि महालक्ष्मीच्या मंत्रांचा जप करणे आवश्यक आहे. पुढे जाणून घ्या, लक्ष्मी-गणेश मंत्र...