आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahalakshmi Fast Tomorrow, Know Worship Method And 8 Simple Measures

महालक्ष्मी व्रत आज : जाणून घ्या, पूजन विधी आणि 8 चमत्कारिक प्रभावी उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार श्राद्ध पक्षातील अष्टमी तिथीला महालक्ष्मीचे व्रत केले जाते. या दिवशी स्त्रिया हत्तीवर विराजित लक्ष्मीची पूजा करतात. यावर्षी हे व्रत 16 सप्टेंबर मंगळवारी आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा अशा प्रकारे करावी...

- संध्याकाळी शुद्धता पूर्वक घरामध्ये एका चौरंगावर लाल कपडा टाकून त्यावर केशर मिश्रित चंदनाने अष्टदल काढून व तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशाजवळ हळदीने कमळ काढून त्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी.

- मातीचा हत्ती बाजारातून विकत आणावा किंवा घरात तयार करून त्याला स्वर्णाभूषणांनी सजवावे. नवीन खरेदी केलेलं सोनं हत्तीवर ठेवल्यास पूजेचे विशेष फळ प्राप्त होते. देवी लक्ष्मीसमोर श्रीयंत्रही ठेवावी. कमळाच्या फुलाने पूजा करावी.

त्यानंतर देवी लक्ष्मीच्या आठ रूपांची या मंत्राचा उच्चार करीत हळद-कुंकू, अक्षता, फुल अर्पण करून पूजा करावी...
- ऊँ आद्यलक्ष्म्यै नम:
- ऊँ विद्यालक्ष्म्यै नम:
- ऊँ सौभाग्यलक्ष्म्यै नम:
- ऊँ अमृतलक्ष्म्यै नम:
- ऊँ कामलक्ष्म्यै नम:
- ऊँ सत्यलक्ष्म्यै नम:
- ऊँ भोगलक्ष्म्यै नम:
- ऊँ योगलक्ष्म्यै नम:

- त्यानंतर धूप आणि तुपाच्या दिव्याने पूजा करून नैवेद्य दाखवून लक्ष्मीची आरती करावी. अशा प्रकारे देवीची विधिव्रत पूजा केल्यास लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

- देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)