आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maha Shivaratri Do Lord Shiva Worship By This Method Know Auspicious Time

आज महाशिवरात्रीला अशाप्रकारे करा शिव पूजा, हे आहेत शुभ मुहूर्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (17 फेब्रुवारी, मंगळवार) महाशिवरात्री आहे. शिव पुराणानुसार या दिवशी महादेवाची विधीपूर्वक पूजा, व्रत केल्यास विशेष फळ प्राप्त होते. महाशिवरात्रीचा पूजन विधी पुढील प्रमाणे...

व्रत विधी
शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करणार्‍या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर कपाळावर भस्म लावून रुद्राक्षाची माळ धारण करावी. त्यानंतर घराजवळील महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करावी. भक्तिभावाने पूजेचा संकल्प खालील मंत्राचा उच्चार करून घ्या...

शिवरात्रिव्रतं ह्येतत् करिष्येहं महाफलम्।
निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते।।

हातामध्ये फुल, अक्षता, पाणी घेऊन खालील मंत्राचा उच्चार करीत शिवलिंगावर पाणी अर्पण करावे...

देवदेव महादेव नीलकण्ठ नमोस्तु ते।
कर्तुमिच्छाम्यहं देव शिवरात्रिव्रतं तव।।
तव प्रसादाद्देवेश निर्विघ्नेन भवेदिति।
कामाद्या: शत्रवो मां वै पीडां कुर्वन्तु नैव हि।।

अशाप्रकारे करावी रात्रीची पूजा -
व्रत करणार्‍या व्यक्तीने दिवसभर शिव मंत्र (ऊं नम: शिवाय) चा जप करावा. दिवसभर उपवास करावा. (रोगी, अशक्त आणि वृद्ध लोक दिवसभर फलाहार करून रात्री पूजा करू शकतात. शिवपुराणामध्ये रात्रीच्या चारही प्रहरांमध्ये शिवपूजन करण्याचे विधान आहे. संध्याकाळी स्नान करून एखाद्या महादेवाच्या मंदिरात जावे किंवा घरीच उत्तर दिशेला मुख करून टिळा लावून आणि रुराक्ष धारण करून पूजेचा संकल्प खालील मंत्राचा उच्चार करून घ्यावा...

ममाखिलपापक्षयपूर्वकसलाभीष्टसिद्धये शिवप्रीत्यर्थं च शिवपूजनमहं करिष्ये

फुल, गंध, चंदन, बिल्वपत्र, धोतरा, धुप, दीप या सर्व सामग्रीने महादेवाची पूजा करावी. भव, शर्व, रुद्र, पशुपती, उग्र, महान, भीम आणि ईशान या नावांचे स्मरण करून महादेवाला फुल अर्पण करून प्रदक्षिणा घालाव्यात. शेवटी महादेवाची प्रार्थना करावी.

नियमो यो महादेव कृतश्चैव त्वदाज्ञया।
विसृत्यते मया स्वामिन् व्रतं जातमनुत्तमम्।।
व्रतेनानेन देवेश यथाशक्तिकृतेन च।
संतुष्टो भव शर्वाद्य कृपां कुरु ममोपरि।।

दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा स्नान केल्यानंतर महादेवाची पूजा करून व्रत समापन करावे.

पुढे वाचा, शिवरात्रीचे महत्त्व आणि पूजेचे शुभ मुहूर्त...