मंगळवार 5 जुलैपासून आषाढ मासातील गुप्त नवरात्र सुरु झाली आहे. ही नवरात्र बुधवार 13 जुलैला समाप्त होईल. मान्यतेनुसार आषाढ नवरात्रीत केलेले उपाय लवकरच शुभ फळ प्रदान करतात. धन, नोकरी, आरोग्य, संतती, विवाह, प्रमोशनशी संबंधीत विविध इच्छा या 9 दिवसात काही उपाय केल्याने पुर्ण होऊ शकतात. जर तुमच्या मनात काही इच्छा असतील तर खाली दिलेले उपाय करुन त्या पुर्ण होऊ शकता. हे उपाय खालील प्रमाणे आहेत...
1. धनलाभासाठी उपाय
गुप्त नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर उत्तर दिशेला मुख करून पिवळ्या आसनावर बसा. समोर तेलाचे नऊ दिवे लावावेत. दिव्यांसमोर लाल तांदळाची (तांदूळ रंगवून घ्या) रास करून त्यावर श्रीयंत्र ठेवा. त्यानंतर श्रीयंत्राची हळद, कुंकू, फुल, अक्षता वाहून पूजा करा. पूजा झाल्यानंतर श्रीयंत्राची देवघरात स्थपना करून इतर सामग्री नदीमध्ये प्रवाहित करा. देवघरात स्थापन केलेल्या श्रीयंत्राची नियमित पूजा करावी. या उपायाने तुम्हाला अचानक धनलाभाचे योग जुळून येतील.
नवरात्रीचे इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...