आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वास्तू : नवरा-बायकोमध्ये वादाचे कारण ठरू शकतो आरसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्रामध्ये घरात ठेवल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचा उल्लेख करण्यात आला आहे. कोणती वस्तू कोठे ठेवल्याने सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो, या गोष्टींचाही वास्तूशास्त्रामध्ये बारकाईने विचार केला जातो. घरामध्ये आरसा कोठे असावा यासंबंधीची विशेष माहिती वास्तुशास्त्रात सांगण्यात अली आहे. आरशामधून एक प्रकारची उर्जा बाहेर पडते. ही उर्जा किती प्रमाणात चांगली आणि वाईट ठरू शकते, हे आरसा कोणत्या ठिकाणी ठेवला आहे यावरून समजते.


येथे लावू नये आरसा -

वास्तुनुसार शयनकक्ष म्हणजे बेडरूममध्ये आरसा लावल्यास पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. बेडरूममध्ये झोपल्यानंतर पती-पत्नीचे प्रतिबिंब आरशात दिसत असेल तर ही स्थिती निर्माण होते. यामुळे आरशासमोर पलंग असणार या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे.


अशा पद्धतीने दूर राहा आरशाच्या वाईट प्रभावापासून -

वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी झोपताना बेडरूममधील आरशावर पडदा टाकावा. तसेच बेडरूममध्ये फुटलेला, तडा गेलेला आरसा नसावा.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सुखी दाम्पत्य जीवनासाठी काही खास टिप्स...
बातम्या आणखी आहेत...