आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navratri Start From Today: Know Flick, According To The Measure Of The Zodiac, Method And Auspicious Pooja

चैत्र नवरात्रीला प्रारंभ : जाणून घ्या, असे उपाय जे पूर्ण करतील तुमच्या सर्व इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा गुढीपाडवा 11 एप्रिल रोजी साजरा झाला. या दिवसापासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होतो. घरोघरी धार्मिक अनुष्ठान, व्रतवैकल्ये, धान्याची पेरणी आणि नंदादीप पूजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवमीपर्यंत हे कार्यक्रम चालतात.

चैत्र, आषाढ, आश्विन तसेच माघ या चार महिन्यांच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र साजरे केले जाते. यापैकी चैत्र महिन्यातील नवरात्र हे वासंतिक नवरात्र, तर आश्विन महिन्यातील नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून ओळखले जाते. आषाढ आणि माघ महिन्यात साजर्‍या होणार्‍या नवरात्रांना गुप्त नवरात्र असे म्हणतात. चैत्र आणि आश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आणि प्रचलित आहेत. नवरात्राच्या या नऊ दिवसांत आदिशक्ती दुर्गेची आराधना, उपासना, व्रत आणि पूजा केली जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी स्थान तसेच शारीरिक शुद्धतेसह चित्रा नक्षत्र किंवा वैघृती योग वगळता सकाळी किंवा अभिजित मुहूर्तावर घटस्थापना आणि धान्याचा पेरणी तसेच नंदादीप प्रज्वलित केला जातो. दुर्गा सप्तशती, देवी भागवत, रामायण, राम नामजप, गायत्री मंत्र तसेच आपली श्रद्धा आणि कुळाचारानुसार पूजा करावी. यासोबतच निराहार, फलाहार किंवा उपवास ठेवावा. भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी रामनवमीला या नवरात्रोत्सवाची सांगता होत असल्याने देवी नवरात्रासोबतच याला रामाचे नवरात्र असेही म्हणतात.