आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Omen Bad Omen: If Lizard Fall On Left Arm There Might Be Money Loss

शकुन-अपशकून : डाव्या हातावर पाल पडल्यास होऊ शकते धनहानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गाने भविष्यात घडणा-या चांगल्या वाईट घटनांची माणसाला पूर्व कल्पना यावी यासाठी बरेच माध्यमं तयार केली आहेत. पशु-पक्षी,जीव-जंतू त्याच माध्यमांपैकी एक आहे. यांच्या माध्यमातून माणसाला भविष्यात येणा-या संकटांच्या पूर्व कल्पनांशी अवगत केले जाते.

सध्याच्या काळात अशा गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवला जात नाही परंतु शास्त्रामध्ये पशु-पक्षांकडून प्राप्त होणाऱ्या संकेतांचे स्पष्ट वर्णन मिळते. घरात आढळणारी पाल देखील भविष्यात घडणा-या घटनांचे संकेत देत असते. जाणून घ्या, कशा प्रकारे पाल भविष्यात घडणा-या घटनांचे संकेत देते.
- एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अथवा उजव्या हतावर पाल पडल्यास सन्मान मिळण्याची शक्यता असते. परंतु पाल डाव्या हातावर पडल्यास धनहानी होऊ शकते. पाल एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरून डाव्या बाजूने चढून उजव्या बाजूने उतरली तर त्या व्यक्तीला पदोन्नती म्हणजे प्रमोशन आणि धनलाभ होण्याची शक्यता वाढते.
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)