आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर आई आणि लेफ्टनंट वडिलांचा हा मुलगा आहे अघोरी, असा बनला साधू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा : येथे गंगेच्या काठावरील बांसघाट स्मशानात झोपडीत राहणाऱ्या एका अघोरीची कथा सर्वांना चकित करणारी आहे. या अघोरी साधूला लोक पंखा बाबा नावाने ओळखतात. लोकांना या बाबांच्या कुटुंबाविषयी समजल्यानंतर ते चकित झाल्याशिवाय राहत नाहीत. यांचे संपूर्ण कुटुंब हाय प्रोफाइल आहे. आई लंडनमध्ये डॉक्टर तर वडील रिटायर्ड लेफ्टनंट आहेत.

अशी आहे बाबांची संपूर्ण कथा
- पंखा बाबा मूळचे जालंधर येथील आहेत. अघोरी बाबाला कुटुंबातील सदस्य लंडनला घेऊन गेले होते परंतु तेथे बाबांचे मन लागले नाही आणि ते भारतात निघून आले. या अघोरी बाबाच्या आई-वडिलांनी यांचे नाव लक्ष्मीनारायण ठेवले होते तर लोकांनी यांना गौरीगीरी नाव दिले आहे. डॉक्टर आईला मुलाने डॉक्टर व्हावे असे वाटत होते तर वडिलांची मुलाने सैन्यात जावे अशी इच्छा होती. परंतु लक्ष्मीनारायण (अघोरी बाबा)चे शाळेत मन रमत नव्हते. यामुळे त्यांना अनेकवेळा शाळेतील शिक्षकांकडून मारही खावा लागला आहे.

- एके दिवशी शाळेत उशिरा आल्यामुळे शिक्षकाने यांना खूप मारले होते. यामुळे बाबांना खूप राग आला. त्यांनी दगडाने शिक्षकांचे डोके फोडले. यावर बाबा सांगतात की, जर मी शिक्षकाला मारले नसते तर घरही सोडावे लागले नसते. शिक्षकाचे डोके फोडल्यानंतर आई-वडिलांच्या क्रोधापासून स्वतःला वाचवण्यासाठी पहिले दिल्लीला गेलो आणि नंतर मुंबईला. अनेक दिवस उपाशी राहिलो पण कोणालाही काही मागितले नाही. एका महात्म्याने जेवू घातले आणि सोबत घेऊन गेले. त्यानंतर त्यांचा चेला बनवून घेतले.

- वयाच्या 12 व्या वर्षांपासून ते दररोज जंगलात जाऊन लाकडे तोडून आणत होते. ते साधू महंत गेणेशगिरी यांच्यासोबत अनेक वर्ष राहिले. बाबांनी सांगितले आज ते जे काही आहेत ते सर्व देवी भावतीच्या कृपेने आहे. कोणतेही तंत्र-मंत्र करत नाहीत, नेहमी देवीच्या भक्तीमध्ये लिन राहतात. बाबांचे वय आता जवळपास 75 वर्ष आहे.

- बाबा आपल्या भक्तांच्या आग्रहावरून नवरात्रीमध्ये देवी भगवतीच्या उपासनेसाठी आले आहेत. त्यांनी सांगितले की, देवी भगवतीच्या कृपेने बांसघात सिद्धेश्वरी काली मंदीरासमोर स्मशानात उपासनेची संधी मिळाली आहे.

- यावेळी बाबांनी देशाचे सैनिक जे सीमेवर लढत आहेत त्यांच्या कल्याण आणि देशाच्या सुरक्षेसाठी देवीकडे प्रार्थना करत असल्याचे सांगितले.
- बाबांनी सांगितले की, आसाम कामरूप कामाख्यामध्ये राहताना पर्वतांमधून चालताना खूप गरमी व्हायची, तेव्हा आई-आई ओरडत पंखा-पंखा असे शब्द उच्चारात होतो. तेव्हापासून लोकांनी पंखा बाबा नाव ठेवले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा बाबीचे खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...